+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustएनआयटीचे विद्यार्थी तंत्रशिक्षण बोर्डाच्या परीक्षेत अव्वल adjustजरग विद्यामंदिरमध्ये नानासो जरग यांना श्रद्धांजली adjustकोल्हापुरात ट्रक महोत्सव उत्साहात ! चेतन मोटर्स - टाटा मोटर्सचा पुढाकार !! adjustबालिश नेत्याची मुलं विशाळगड आंदोलनात का नव्हती ? सतेज पाटलांचा खासदार महाडिकांना टोला adjustसदभावना रॅलीतून प्रकटला सामाजिक एकोप्यावरील विश्वास adjustशहरातील पाणी पुरवठासंबंधी भाजप नगरसेवकांची अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठक adjustमहायुती, महाविकासला पर्याय परिवर्तन आघाडी ! पुण्यात विविध संघटना नेत्यांची बैठक !! adjustव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीवर आघाडीचा बहिष्कार ! कुलगुरुंच्यावर मनमानी कारभाराचा आरोप !! adjust४२ हजार वीज कंत्राटी कामगारांना न्याय कधी मिळणार ? राज्यभर आमरण उपोषणाचा इशारा adjustप्रशासकीय कामकाजाला हवा माणुसकीचा चेहरा !
1000621806
1000615695
1000597139
1000567748
1000562876
1000551727
schedule19 Jun 24 person by visibility 89 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी सूचना आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या दैनंदिन कामांबाबतच्या तक्रारी संकलित करण्यासाठी आयोजित केलेल्या मुक्त संवाद कार्यक्रमाला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागरिकांनी महानगरपालिकेच्या कामाबाबत शेकडो तक्रारी आणि विकासाबाबत अनेक महत्वाच्या सूचना दिल्या.
अ माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. शहरातील समस्यांच्या निराकरणासाठी आणि शहराच्या शाश्वत विकासासाठी शहराच्या विकासाची तळमळ असलेल्या शहरवासीयांचा दबाव गट निर्माण करणे हा मूळ उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले
कोल्हापूरचा शाश्वत विकास कसा असावा याबाबत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष ऍड. राजेंद्र किंकर, प्लास्टिक कचरामुक्त कोल्हापूर आणि वृक्ष मित्र संघटनेच्या सविता साळोखे, सावली चे किशोर देशपांडे, सिटिझन बटालियनचे डॉ. प्रीतम शहा, सी. ए.मनोज प्रसादे, डॉ. विनायक दिवाण, गजानन मुनिश्र्वर, नेस्टी सोशल फाउंडेशनचे अमर संकपाळ, वृक्षप्रेमी संघटनेचे अमोल बुध्ढे, निसर्ग मित्र संस्थेचे अनिल चौगुले प्रमोद रायरीकर, सतीश आंबर्डेकर, प्रा. मीनल व्हटकर, चैतन्य ग्रुप चे दत्तात्रय अंजनेकर यांनी आपल्या सूचना मांडल्या.कोल्हापूर अर्थ वॉरियर्सचे अभिजीत कुलकर्णी, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी विकासाच्या अनुषंगाने महत्वाच्या सूचना केलय 
  यामध्ये प्रामुख्याने टिकाऊ रस्त्यांची बांधणी, पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन, कचरा उठाव आणि वर्गीकरण तसेच प्रक्रियेसाठी उपाय, मार्केट मधील कचरा भटक्या गायी म्हशींना देण्यासाठी गोशाळा, शहराच्या प्रवेशद्वारावर मोठी पार्किंग आणि तेथून शटल सर्व्हिस, उद्यान खाते  अशा वैविध्यपूर्ण विषयावर सूचना करण्यात आल्या. शहरातील पार्किंग व्यवस्था, अतिक्रमण, फेरीवाला झोन यासंबंधी नागरिकांच्या सूचना आहेत.
 प्रकाश घाडगे, संदीप कुंभार, कविता बंकापुरे, अविनाश पेंढुरकर, धनाजी भोसले, संभाजीराव पवार, पारस पालीच्या, हर्शांक हरळीकर, रितेश बोडके, राहुल पाटील, संतोष लाड, राजू मोरे, ज्येष्ठ नागरिक प्रकाश मोरे आदींनी आपल्या तक्रारी मांडल्या. 
 माजी नगरसेवक विजय खाडे यांनी स्वागत केले. माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे यांनी यापुढे होणाऱ्या प्रत्येक उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. माजी नगरसेवक प्रदीप उलपे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ओंकार गोसावी, अमेय भालकर, सुनील पाटील, ऋतुराज नढाळे यांनी विशेष परिश्रम केले.