तपोवन मैदानावर चार डिसेंबरपासून सतेज कृषी प्रदर्शन
schedule29 Nov 26 person by visibility 11 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: शेतकऱ्यांना शेतीची व शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने तपोवन मैदान येथे चार ते सात डिसेंबर या कालावधीत सतेज कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. या चार दिवसीय प्रदर्शनात विविध कंपन्यांचा सहभाग आहे. त्याचबरोबर पशुपक्षी दालन, तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, विविध कंपन्यांची उत्पादने, शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, शेतीविषयक अद्ययावत मशिनरीची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. या प्रदर्शनात २०० पेक्षा जास्त अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग आहे. २०० पेक्षा अधिक पशू पक्षी असतील.फुलांचे प्रदर्शन व विक्री, बचत गटांचे स्टॉलचा समावेश आहे. डीवाय पाटील ग्रुप, राज्य सरकारचे कृषी विभाग, आत्मा, कृ़षी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन होत असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. या प्रदर्शनाला लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.