Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जुनी पेन्शनसाठीच्या मूक मोर्चाला शैक्षणिक व्यासपीठ, मुध्याध्यापक संघाचा पाठिंबादप्तर झाले हलके... आनंदित झाली बालके !होस्टेलमध्ये रक्षाबंधन, विद्यार्थिनींनी बांधली कृष्णराज महाडिकांना राखीसतेज पाटलांच्याकडे ठरावधारकांची संख्या कमी, म्हणून ते भाजप नेत्यांना भेटतात - धनंजय महाडिकबाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत रंगल्या राजकीय कोट्या, मनातील सल अन् सभापतिपदासाठी वाट पाहण्याची ईच्छा‘कोल्हापूरचे महापौर’पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन दिमाखातप्रल्हाद चव्हाणांनी स्वहिताची नव्हे तर समाजहिताची भूमिका अंगिकारुन आयुष्यभर कार्य केले- पालकमंत्री प्रकाश आबिटकरपुणे शिक्षक मतदारसंघासाठी टीडीएफकडून  कौस्तुभ गावडे यांची  उमेदवारी जाहीरकोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी प्रा. शेखर देसाई, उपसभापतिपदी पांडूरंग काशीदकोल्हापूर शहरात 31 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा

जाहिरात

 

दप्तर झाले हलके... आनंदित झाली बालके !

schedule29 Aug 26 person by visibility 14 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :'दप्तर हलके करा, बालपण वाचवा!' या संकल्पनेंतर्गत कागल तालुक्यातील विद्यामंदिर वाळवे खुर्द जिल्हा परिषद शाळेने उपक्रम राबविला. जड दप्तरांमुळे मुलांच्या पाठीवर पडणाऱ्या ताणाची चिंता व्यक्त करत आहेत. अनेक बालतज्ज्ञांनीही यावर उपाययोजना सुचविल्या होत्या. सरकारने 'एकच पाठ्यपुस्तक' हा प्रयोग अमलात आणला होता, पण त्याचा फारसा सकारात्मक उपयोग झाला नाही. मात्र, वि. मं. वाळवे खुर्द शाळेने थेट कृती करून दाखवली आहे. पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लॉकर्स उपलब्ध करून देऊन सरकारी शाळेतही चांगल्या दर्जाची सुविधा निर्माण केली आहे.दररोज लागणारी पुस्तके शाळेतच सुरक्षित राहिल्याने मुलांचा शारीरिक त्रास कमी झाला असून शिक्षणातील रस नक्कीच वाढेल. सर्वप्रथम एका माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने दोन लॉकर्स प्रदान केली होती . त्यानंतर वाळवे ग्रामपंचायतीने १७ व्या वित्त आयोगातून सर्व वर्गांना लॉकर्स  पुरविले. "समस्येवर केवळ चर्चा करता प्रत्यक्ष तोडगा काढून मुलांचे बालपण जपण्याचे काम या शाळेने केले आहे." अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांतून उमटत आहेत.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes