Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गगन डडजज ददहोस्टेलमध्ये रक्षाबंधन, विद्यार्थिनींनी बांधली कृष्णराज महाडिकांना राखीसतेज पाटलांच्याकडे ठरावधारकांची संख्या कमी, म्हणून ते भाजप नेत्यांना भेटतात - धनंजय महाडिकबाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत रंगल्या राजकीय कोट्या, मनातील सल अन् सभापतिपदासाठी वाट पाहण्याची ईच्छा‘कोल्हापूरचे महापौर’पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन दिमाखातप्रल्हाद चव्हाणांनी स्वहिताची नव्हे तर समाजहिताची भूमिका अंगिकारुन आयुष्यभर कार्य केले- पालकमंत्री प्रकाश आबिटकरपुणे शिक्षक मतदारसंघासाठी टीडीएफकडून  कौस्तुभ गावडे यांची  उमेदवारी जाहीरकोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी प्रा. शेखर देसाई, उपसभापतिपदी पांडूरंग काशीदकोल्हापूर शहरात 31 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा

जाहिरात

 

होस्टेलमध्ये रक्षाबंधन, विद्यार्थिनींनी बांधली कृष्णराज महाडिकांना राखी

schedule29 Aug 26 person by visibility 15 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  गगनबावडा इथल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आणि वसतिगृहात रक्षाबंधन स्नेहमेळा उत्साहात झाला. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विद्यालयातील मुलींनी त्यांना राख्या बांधून स्नेहभाव जपला. मुलींच्या शिक्षणासाठी इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड भेट देत कृष्णराज महाडिक यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव सोबत राहण्याचं आश्वासन दिले.
   इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्डमुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी ही भेट निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.वसतिगृहातील मुलींसाठी आवश्यक असणार्‍या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  महाडिक यांनी वसतिगृहातील स्वयंपाकघरासह विविध विभागांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. विद्यार्थिनींशी संवाद साधत स्वतःचं करिअर कसे निवडावे, ध्येय निश्चित करून त्यासाठी जिद्द आणि सातत्याने प्रयत्न कसे करावेत, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. राजमाता जिजाऊ, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुलींनी शिक्षणाच्या बळावर मोठी स्वप्ने पूर्ण करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी गगनबावडा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी वसुंधरा कदम यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देत त्यांच्या वसतिगृह भेटीमागील उद्देश स्पष्ट केला. या कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ कुंभार, केंद्रप्रमुख श्रीरंग माने, गृहप्रमुख गीता पाटील आणि निशा सुतार, मुख्याध्यापक रंगराव गोसावी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसंच युवा मोर्चाचे सदस्य सचिन जाधव, जावेद अत्तार, उत्तम बंडागळे, नारायण पाटील, अजित दळवी, विशाल पवार, अजित भोसले, रोहित गावकर, युवराज पाटील, विश्वास केतन, गणेश महाडिक, तेजस डाकवे, अविनाश बंडागळे, विष्णुदास गावकर, संदीप गावकर, दीपराज गावकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes