+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule05 Dec 22 person by visibility 365 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदलीसाठी ३० जून २०२३ संदर्भ दिनांक धरावा. त्यानुसार २०२२-२३ च्या बदलीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करावे  यासह शिक्षकांच्या मागण्यांचे विविध ठराव महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पनवेल येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्य कार्यकारिणी सभेत संमत करण्यात आले. संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील बैठकीचे अध्यक्षस्थानी होते. सभेत झालेल्या मागण्यांचे निवेदन राज्य सरकारकडे दिले.
   संवर्ग १ व २ चा प्रथम लाभ घेणाऱ्या शिक्षकांना एका शाळेत ३ वर्षाची अट लावणे बदली शासन निर्णयानुसार उल्लंघन होत असल्याने ही अट रद्द करावी. दोन डिसेंबर २०२२ रोजी जाहीर केलेले बदली वेळापत्रक रद्द करून ३० जून २०२३ संदर्भ दिनांक पकडून बदली बाबतचे सुधारित वेळापत्रक या आठवड्यात जाहीर करा अशी मागणी करण्यात आली आहे.
     बैठकीत सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लवकर लागू करावी, मुख्यालये बांधून दिल्याशिवाय मुख्यालयी राहण्याची अट नसावी, शिक्षक भरती तात्काळ करावी, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती व समाजकल्याण शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करावी, पदवीधर शिक्षक वेतनातील तफावत दूर करावी, शालेय पोषण आहारातील धान्य तपासले जावे, शिक्षकांना बी एल ओ कामातून मुक्त करावे , शिक्षकांना  आश्वासीत प्रगती योजना लागू करावी, दर तीन महिन्यानी विस्तार अधिकारी- केंद्रप्रमुख पद्धती व दर सहा महिन्यांनी मुख्याध्यापक- विषय शिक्षक पदोन्नती व्हावी, १०० टक्के विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी आदी मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले.
     बैठकीस  राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, राज्य उपाध्यक्षा प्रमिला माने, राज्य संघटक पी आर पाटील, शशिकांत पवार, प्रदिप पवार, किशोरछ आनंदवार, इरफान मिर्झा, संजय चिडे, प्रदीप गावंडे, वसंत मोकल, सुनील देशमुख, विकास गायकवाड उपस्थित होते.
     रायगड जिल्हाध्यक्ष वसंत मोकल यांनी स्वागत केले रायगड जिल्हा कोषाध्यक्ष सुनिल देशमुख यांनी देशमुख यांनी आभार मानले.