Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड सतरा मार्चला ! पंचायत समिती सभापती दहा मार्चला निवडणार!!शिक्षण घेणं म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान मिळवणं नव्हे तर माणूस म्हणून जगणे महत्त्वाचे - कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहातकृष्णराज महाडिकांचे  रविवारी कोल्हापुरात होणार  जल्लोषी स्वागतडीवाय पाटील पॉलिटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिकअक्षरांच्या दुनियेतील ‘मनोहर’ प्रवास ! महापालिका शाळेत ‘लेखक आपल्या भेटीला’ सोहळा!!महापौरांनी केली पुतळयाची स्वच्छता, उपमहापौरांकडून धूर फवारणी ! आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली साफसफाई! !न्यू कॉलेज, सेवकांची पतसंस्था चेअरमनपदी पी. डी. चौगले, व्हाइस चेअरमनपदी एस. पी. मानेशाहू महाराज हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त  बालवाद्यवृंदाचा मराठी गीत गायन कार्यक्रमकोल्हापूरच्या औद्योगिक भरारीला महानिर्यात इग्नाईटची साथ

जाहिरात

 

कृष्णराज महाडिकांचे  रविवारी कोल्हापुरात होणार  जल्लोषी स्वागत

schedule27 Feb 26 person by visibility 124 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे रविवारी १ मार्च 2026 रोजी कोल्हापुरात आगमन होत आहे. यानिमित्त त्यांचे  दुचाकी रॅलीने जल्लोषी स्वागत करण्याचा निर्धार  कार्यकर्त्यांनी केला आहे.  खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये २ हजार दुचाकी स्वारांची रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

 कृष्णराज महाडिक  यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड होणे हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे. पक्षाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ते आपल्या कार्यक्षमतेने योग्य पध्दतीने पार पाडतील, तसेच पक्षाची भूमिका पटवून देणे आणि विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूरच्या परंपरेला साजेल असेच त्यांचे स्वागत व्हावे, अशी अपेक्षा देखील खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी स्वागत रॅलीसंबंधी माहिती दिली. दुपारी ४ वाजता छत्रपती ताराराणी चौकातून कृष्णराज महाडिक यांच्या स्वागत रॅलीला सुरूवात होणार आहे. या रॅलीत २ हजार पेक्षा अधिक दुचाकी स्वारांचा समावेश आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित होईल. त्यानंतर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कृष्णराज महाडिक पक्ष कार्यालयात शुभेच्छा स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमात जनतेने उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष जाधव यांनी केले आहे. कृष्णराज महाडिक यांची निवड हा संपूर्ण कोल्हापूरचा सन्मान असल्याचेही   सांगितले. दरम्यान कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसंच विविध समित्यांवर निवड झालेल्यांचा सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते झाला. यामध्ये विजय जाधव, सुनील वाडकर, हेमंत आराध्ये, आप्पा लाड, प्रा. जयंत पाटील, प्रशांत मोरे, प्रसाद जाधव, तानाजी पाटील यांचा समावेश होता. यावेळी जिल्हा परिषद राजवर्धन नाईक-निंबाळकर, नाथाजी पाटील, गटनेते मुरलीधर जाधव  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes