Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कृष्णराज महाडिकांचे  रविवारी कोल्हापुरात होणार  जल्लोषी स्वागतडीवाय पाटील पॉलिटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिकअक्षरांच्या दुनियेतील ‘मनोहर’ प्रवास ! महापालिका शाळेत ‘लेखक आपल्या भेटीला’ सोहळा!!महापौरांनी केली पुतळयाची स्वच्छता, उपमहापौरांकडून धूर फवारणी ! आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली साफसफाई! !न्यू कॉलेज, सेवकांची पतसंस्था चेअरमनपदी पी. डी. चौगले, व्हाइस चेअरमनपदी एस. पी. मानेशाहू महाराज हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त  बालवाद्यवृंदाचा मराठी गीत गायन कार्यक्रमकोल्हापूरच्या औद्योगिक भरारीला महानिर्यात इग्नाईटची साथआरोग्यमंत्र्याची संकल्पना, कोल्हापुरात पायलट प्रोजेक्ट! एक हजार मोफत शस्त्रक्रिया! ! राजर्षी शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारकाचा आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे: राजेश क्षीरसागरश्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतनीकरण इमारतीचे शनिवारी उद्घाटन

जाहिरात

 

शाहू महाराज हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त  बालवाद्यवृंदाचा मराठी गीत गायन कार्यक्रम

schedule27 Feb 26 person by visibility 26 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जुना बुधवार पेठ परिसरातील  राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला .प्रारंभी मराठी विभाग प्रमुख शिक्षिका बी .एन .थोरात यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे,  मुख्याध्यापक बी.जे. सावंत, प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक एस .व्ही .पोवार उपस्थित होते. याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख थोरात यांनी कुसुमाग्रजांची माहिती सांगितली. मराठी भाषेची थोरवी व्यक्त केली. संगीत शिक्षक महेश हिरेमठ व एस.टी .पाटील यांनी आपल्या बालवाद्यवृंदासह ‘लाभले भाग्य आम्हास ,  मोरया, देहाची तिजोरी,अभिर गुलाल, शोधिसी मानवा, विठ्ठलगीत ,शूर आम्ही सरदार , चिकमोत्याची माळ’ अशी भक्तीगीते  सादर केली. विद्यार्थिनी रिद्धी चौगुले व अक्षता  होगाडे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षिका एस.आय चौगुले यांनी आभार मानले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes