कोल्हापुरात रविवारी राजर्षी शाहू कार्य संवर्धन संमेलन, 25 इतिहास अभ्यासक - संशोधकांचा सहभाग
schedule22 Jul 26 person by visibility 30 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राजर्षी शाह महाराजांच्या जीवन चरित्रावर संशोधन, अभ्यास करत असलेल्या कोल्हापुरातील शाहू अभ्यासक, संशोधकांच्या उपस्थितीमध्ये रविवारी 26 जुलै 2026 रोजी 'राजर्षी शाहू कार्य संवर्धन संमेलन' आयोजित केले आहे. अशी माहिती राजर्षी शाहू सलोखा मंचचे निमंत्रक वसंतराव मुळीक व सहनिमंत्रक बबनराव रानगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या संमेलनामध्ये इतिहास संशोधक डॉ. भाऊसाहेब खणे, डॉ. रमेश जाधव, डॉ. विलास पवार, डॉ. टी एस पाटील, डॉ. ए एम वैराट, इंद्रजीत सावंत, डॉ. जे के पवार , डॉ. पद्मा पाटील, श्रीराम पचिद्रें, गणेशकुमार खोडके, डॉ. अरुण शिंदे, डॉ. मंजुश्री पवार, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. गिरीश मोरे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. देविकाराणी पाटील, डॉ. संभाजी बिरंजे, डॉ. कपिल राजहंस, डॉ. वसंतराव भागवत, चंद्रकांत पाटील, स्वप्नजा घाटगे, सुनील माने, उमेश सूर्यवंशी, राम यादव, अमित अडसुळे, विक्रम रेपे, संदीप मगदूम, शाहीर विजय शिंदे यांना निमंत्रित केले आहे. या संमेलनात राजर्षी शाहू महाराजांचे कार्य व विचारांचे जतन -संवर्धन ताकतीने होण्यासाठी चर्चा होणार आहे अशी माहिती मुळीक व रानगे यांनी दिली. पत्रकार परिषदेला संजय कांबळे, डी.जी. भास्कर, शशिकांत पाटील, विजय पाटील, सोमनाथ घोडेराव, शिवमुर्ती झगडे, बबन शिंदे, प्रताप नाईक, संदेश माने, नकुल पाटील, कादर मलबारी आदी उपस्थित होते