जनस्वास्थ्य दक्षता समितीतर्फे प्रिन्सेस इंदूमतीदेवी हायस्कूलला आदर्श शाळा पुरकार
schedule11 Feb 25 person by visibility 402 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षण संस्थेच्या प्रिन्सेस इंदूमतीदेवी हायस्कूल फॉर गर्ल्समध्ये आरोग्य पर्यावरण व वैज्ञानिक दृष्टिकोन या अनुषंगाने जनस्वास्थ्य अभियान राबविले. याबद्दल जनस्वास्थ्य दक्षता समितीतर्फे शाळेला आदर्श शाळा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समितीचे अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.याप्रसंगी समितीचे प्रमुख उमा भोसले, पूजा उपाध्ये यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका साधना पोवार, पर्यवेक्षिका सुलक्षणा मुळे यांचे अभियानसाठी मार्गदर्शन लाभले. पुरस्कार वितरण सोहळयाप्रसंगी शिक्षिका संगीता पोवार, सीमा सुर्यवंशी आदी उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा मधुरिमाराजे छत्रपती, स्कूल कमिटी सदस्य, कार्यकारिणी सदस्यांचे प्रोत्साहन लाभले.