Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटतर्फे वार्षिक चित्रप्रदर्शन शिक्षण हक्क आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ ताकतीने उतरणारमाझी शपथ झाली की तुमची शपथ होणारच...! अजित पवारांच्या आठवणीने मुश्रीफ व्याकुळडॉ. सुनीलकुमार लवटे विचारमंचच्या सभेत वंदे मातरमवर चर्चाएआयच्या माध्यमातून स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये मोठी झेप घेता येणे शक्य - प्रफुल्ल खचणे संजय घोडावत आयआयटी - मेडिकल अकॅडमीचे जेईईमध्ये यशज्ञान- कौशल्य - सकारात्मक दृष्टिकोन ही यशाची त्रिसूत्री :  संजय बाबर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाइतकेच  कौशल्य विकसित करणे हेच राष्ट्राचे खरे बळ - पद्मश्री जी. डी. यादवनव्या सभागृहाच्या पहिल्या सभेत तरुण नेतृत्वाची छाप, प्रभागासह शहराचे विषय मांडलेनगरसेवकांचा प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार, महापौरांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

जाहिरात

 

एआयच्या माध्यमातून स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये मोठी झेप घेता येणे शक्य - प्रफुल्ल खचणे

schedule23 Feb 26 person by visibility 24 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ इंडस्ट्री ४.० च्या माध्यमातून जागतिक स्तरावर योगदान देण्यासाठी आपण सर्वांनी ऑटोमेशन  ही संधी मानावी. एआयच्या माध्यमातून स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये मोठी झेप घेता येणे शक्य आहे.’ असे मत जिओ मॅट्रिक्स ऑटोमेशन अँड रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे येथील  व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल खचणे यांनी व्यक्त केले.

येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील पायोनियर २६ हा २ दिवसीय टेक्नो फेस्ट उत्साहात झाले.या टेक फेस्ट मध्ये १२ स्पर्धांच्या माध्यमातून ,१४ राज्य व जवळपास ९० महाविद्यालयातून ६००० स्पर्धक सहभागी झाले होते. संस्थेचे विश्वस्त सुनील कुलकर्णी हे अध्यक्षस्थानी होते.आय.एस.टी.ई.स्टुडन्ट चाप्टरच्या फॅकल्टी ॲडव्हायझर प्रा.अश्विनी शिंदे यांनी पायोनियर २६ चा एकत्रितपणे दर्जात्मक व संख्यात्मक आढावा उपस्थितांसमोर ठेवला. 

केआयटीचे विश्वस्त सुनील कुलकर्णी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी प्रागती करण्यासाठी स्वतःच्या कंफर्ट झोन मधून बाहेर पडून आपला कर्मपथ निश्चित करून त्याच्यावर सातत्याने मार्गक्रमण करत राहावे यश तुमचेच आहे.’ अभिव्यक्ती या पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये व्हीजेटीआय, डी.जे.संघवी इंजिनिअरिंग कॉलेज मुंबई, गोगटे इंजिनिअरिंग कॉलेज बेळगावी,सीओईपी विद्यापीठ पुणे, केआयटी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादित केले.तर प्रकल्प या प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये क्राईस्ट डीम्ड युनिव्हर्सिटी बेंगलोर, सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेज, खारघर, मुंबई केएलई टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी बेळगावी, अजिंक्य डीवायपाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग,पुणे ,डी.जे.संघवी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सांगली, व्हिजेटीआय या केआयटी या महाविद्यालयांनी विविध गटातील पारितोषिक प्राप्त केले. समारोप कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक डॉ मोहन वनरोट्टी, रजिस्ट्रार डॉ.डी.जे.साठे  उपस्थित होते. त्रिशा कल्याणकर, मांगरीश प्रभावळकर, आयुषी वासनिक, आर्यन शर्मा, चैत्राली पाटील, मृण्मयी झिरंगे या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. अधिष्ठाता डॉ जितेंद्र भाट यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes