विवेकानंदमधील प्रा. संदीप पाटील यांना उत्कृष्ठ कार्यक्रमाधिकारी पुरस्कार
schedule22 Oct 24 person by visibility 184 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रीय सेवा योजनेत उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणार २०२२-२३ या वर्षाचा उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार प्रा. संदीप पाटील यांना जाहीर झाला आहे.
प्रा. पाटील यांनी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर.कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग नोंदविला. यामध्ये एड्स जनजागृती रॅली, वृक्षारोपन, पंचगंगा वाचवूया, स्त्रीभ्रूण हत्या, अंधश्रध्दा निर्मुलन, आझादी का अमृत महोत्सव, मेरी मिटी मेरा देश, गणेश मूर्ती व निर्माल्य् संकलन, अनाथश्रम व वृध्दाश्रम येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन, वाहतूक सुरक्षा सप्ताहातील सक्रिय सहभाग , रक्तदान शिबीर आयोजन अशा विविध कार्यक्रमात पुढाकार घेतला.
या कामाची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठातर्फे त्यांना २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण समारंभ २५ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता . शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत राजर्षी शाहू सिनेट सभागृह येथे होणार आहे.
या निवडीबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे व मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, कॉलेजचे रजिस्ट्रार आर.बी.जोग यांनी अभिनंदन केले.