Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छछ ददआरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी गुणांकन, तीन वर्षांच्या रिपोर्ट कार्डवर श्रेणी निश्चितीमाणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या चौकटी मोडून टाकण्याची जबाबदारी शिक्षकांची : हिंदुराव हुजरे-पाटीलकोजिमाशितर्फे कर्जमर्यादा ६२ लाखापर्यंत ! २४ टक्के लाभांश, मंगळवारपासून खात्यावर जमा ! !  शिक्षकांचे आंदोलन, निवेदन स्वीकारायला वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित ! आमदारांनी केला जिल्हा प्रशासनाला निषेध !!आठ थर अन् ट्रिपल एक्क्याची कमाल…शिवनेरी गोविंदा पथकाने फोडली युवाशक्तीची तीन लाखाची दहीहंडी सकल मराठा शौर्यपीठाच्यावतीने प्रतिकात्मक दहीहंडीकृष्णराज महाडिकांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत, मनसेच्या नादाला लागू नयेकॅम्पस टू कार्पोरेट...बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये मायक्रोसॉफ्टकडून मार्गदर्शनसन्मानाच्या दिनीच शिक्षक रस्त्यावर !  जुनी पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !!

जाहिरात

 

आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी गुणांकन, तीन वर्षांच्या रिपोर्ट कार्डवर श्रेणी निश्चिती

schedule06 Sep 26 person by visibility 24 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरी आधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीने गुणांकन होणार आहे. मागील तीन वर्षांतील कामगिरीच्या आधारे त्यांची श्रेणी निश्चित केली जाणार आहे. या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचे वाटप, पुढील तीन वर्षांचे कार्यनियोजन, भविष्यातील नियुक्त्यांच्या वेळी केला जाणार आहे.

३१ मार्च २०२६ रोजी किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कामाची माहिती अद्ययावत करून त्यांचे गुणांकन केले जाणार आहे. २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन वर्षांतील पदावरील कामकाजाचा विचार करून एकूण १०० गुणांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. या गुणांकनानुसार अधिकाऱ्यांचे , , आणि अशा चार श्रेणींत वर्गीकरण केले जाणार आहे. दरवर्षी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक आरोग्य विभागात गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांना केंद्रस्थानी ठेवून प्रशासकीय सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. या प्रक्रियेला प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक आणि आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्या प्रशासकीय अनुभवाची साथ मिळणार आहे.

रुग्णसेवेपासून डिजिटल कामकाजापर्यंत ११ कसोट्या

अधिकाऱ्यांचे गुणांकन करताना केवळ कागदोपत्री कामकाजाचा विचार करता जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. लोकाभिमुखता, तक्रार निवारण, नेतृत्वगुण, विशेष कौशल्य, प्रशिक्षण आणि संवादकौशल्य यांचा विचार केला जाणार आहे. जिल्हा वार्षिक नियोजन, राज्य लेखाशीर्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान  आणि सीएसआर निधीचा प्रभावी वापर यासाठी केलेले आर्थिक व्यवस्थापनही तपासले जाणार आहे. आरोग्य संस्थांमधील आहार, औषधांचा पुरवठा, स्वच्छता आणि कंत्राटी मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी केलेली कार्यवाहीही गुणांकनाचा भाग असेल

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes