Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
 अध्यक्ष, सीईओ, सभापतींची शाळेपर्यत धाव ! विद्यार्थिनींच्या प्रकृतीची घेतली माहिती ! !कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राला जागतिक भरारीचे पंख! कोल्हापुरातील आयटी कंपन्या करणार अमेरिकेला सॉफ्टवेअरसह इतर सेवा निर्यात ! !सूरज साखरेवरील गोळीबार प्रकरणी दोन आरोपींना अटकपृथ्वी अजित मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिरकृषी पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत डीवाय पाटील कृषीचे विद्यार्थी राज्यात प्रथमदक्षिण भारत जैन सभेचे १०४ वे नैमित्तिक अधिवेशन २ ऑगस्टला कोल्हापुरातज्येष्ठ विधीज्ञ ॲड. नीला सोनटक्के यांचे निधनशक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शनिवारी पंढरपूरमध्ये सद्बुद्धी दिंडी यात्रा , बाधित शेतकऱ्यांची होणार सभा हॉटेल मालक संघाच्या अध्यक्षपदी सचिन शानभाग, उपाध्यक्षपदी अरुण भोसलेसर्किट बेंचच्या अंतर्गत तक्रार समितीची स्थापना ! अध्यक्षपदी न्यायमूर्ती वृषाली जोशी, समिती सदस्यपदी आठ जण ! !

जाहिरात

 

 अध्यक्ष, सीईओ, सभापतींची शाळेपर्यत धाव ! विद्यार्थिनींच्या प्रकृतीची घेतली माहिती ! !

schedule18 Jul 26 person by visibility 8 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील राजर्षी शाहू निवासी प्रशालेतील विद्यार्थिनींच्या चौकशीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव यांनी शाळेत धाव घेतली. या शाळेतील सहा विद्यार्थिनींना उंदराने चावल्याची घटना घडली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत अध्यक्षा खोत व सभापती यादव यांनी प्रशालेला भेट देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता, आरोग्यविषयक उपाययोजना तत्काळ करण्याच्या सक्त सूचना केल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी जॅसमिन यांनी सकाळी भेट देऊन पाहणी केली. जवळपास दोन तास त्या शाळा परिसरात थांबून सगळी माहिती घेतली. आवश्यक त्या सूचना केल्या. तर अध्यक्षा खोत व सभापती यादव यांनी दुपारच्या सत्रात भेट देऊन विद्यार्थिनींच्या प्रकृतीची माहिती घेतली. या प्रशालेतील त्रुटी दूर कराव्यात. शाळा व होस्टेल परिसरात स्वच्च्छता राबविण्याच्या सूचना केल्या. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांची सुरक्षितता व आरोग्यविषयक उपाययोजनेत हलगर्जीपणा केल्यास कारवाई होईल असेही स्पष्टपणे बजावले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes