प्रयाग चिखली उपसरपंचपदी शारदा कांबळे
schedule24 Oct 24 person by visibility 126 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी एस.आर. पाटील गटाच्या सदस्या शारदा सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच रोहित रघुनाथ पाटील हे अध्यक्षस्थानी होते. माजी उपसरपंच विठ्ठल कळके यांनी ठरल्याप्रमाणे दिलेल्या राजीनाम्यामुळे उपसरपंचपद रिक्त होते. गोकुळचे संचालक एस. आर. पाटील यांच्या गटाकडे नऊ सदस्यांसह बहुमत आहे. रघुनाथ पाटील गटाकडे सरपंचपदासह सात सदस्य आहेत. निवडीनंतर नूतन उपसरपंच शारदा कांबळे यांचा सत्कार झाला. ग्रामविकास अधिकारी सतीश पानारी यांनी आभार मानले