Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
३१ मेपर्यंत थकबाकी भरा, अन्यथा एक जूनपासून दुकानगाळे सील - आयुक्‍त राजेंद्र भारुड कुलगुरुपदासाठी चौदा मे रोजी अंतिम मुलाखती ! डॉ. पी. एस. पाटील, आर. के. कामत, ज्योती जाधव यांचा समावेश !!आनंदोत्सव शिक्षण विभागाने देशात अव्वल स्थान पटकाविल्याचा…संकल्प उत्कर्ष श्रेणी प्राप्तीचाभारतीय जनरल कामगार सेनेतर्फे निदर्शने, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरदमसाचे पुरस्कार जाहीर, 24 मे रोजी पुरस्कार वितरण समारंभ शाहू महाराज हायस्कूलचा दहावीचा निकाल ९७.९८ टक्केफुटबॉलपटूनी चषक जिंकला… अॅक्टिव्हा बक्षीस देऊन होणार गौरवम्युझिकल फाऊटेंनच्या कामात कोणतीही तडजोड नको : आमदार राजेश क्षीरसागरजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कामगिरी भारी, शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत देशात प्रथम क्रमांक वूलू स्वच्छतागृह ठरणार महिला भाविकांसाठी आधारवड ! मातृदिनी भाजपची कोल्हापूरकरांना अनोखी भेट! !

जाहिरात

 

३१ मेपर्यंत थकबाकी भरा, अन्यथा एक जूनपासून दुकानगाळे सील - आयुक्‍त राजेंद्र भारुड

schedule11 May 26 person by visibility 35 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचे थकबाकीदार गाळेधारकांनी ३१ मे २०२६ अखेर थकीत रक्कम भरावी, अन्यथा एक जून २०२६पासून संबंधित गाळे सील करण्याची मोहीम हाती घेण्याच्या सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाची आढावा बैठक आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी गाळेधारकांच्या थकबाकीचा सविस्तर आढावा घेतला.

 बैठकीत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या बहुतांश गाळेधारकांची मुदत २०१५ मध्ये संपलेली आहे.  महानगरपालिकेकडून पाच टक्के भाडेवाढ गृहीत धरून भाडे आकारणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, केवळ वीस ते तीस टक्के व्यावसायिकच नियमित भाडे भरत असून उर्वरित गाळेधारकांकडून थकबाकी वाढत आहे. महानगरपालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही तर शहर विकासकामांवर परिणाम होतो. त्यामुळे सर्व थकबाकीदारांना येत्या ३१ मे पर्यंत अंतिम संधी देण्यात यावी आणि त्यानंतर थकबाकीदार गाळ्यांवर सीलची कारवाई करावी. ज्या गाळेधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे व ज्यांना कलम 81() अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या आहेत अशा गाळ्यांचा तातडीने लिलाव प्रक्रियेद्वारे पुनर्वाटप करावे अशा सूचना दिल्या. तसेच खुल्या जागेची थकबाकी असलेल्या व्यावसायिकांवरही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महानगरपालिकेचे हॉल, भाजी मार्केट व पार्किंग व्यवस्था यांचे निविदा प्रक्रिया राबवून तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. याशिवाय हॉकी स्टेडियम परिसरातील गाळे सध्याच्या स्थितीत लिलावाद्वारे एजन्सीला देण्याचा प्रस्ताव सादर करावा असे आयुक्तांनी सांगितले. उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे व इस्टेट विभागीत लिपीक उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes