Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कामगिरी भारी, शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत देशात प्रथम क्रमांक वूलू स्वच्छतागृह ठरणार महिला भाविकांसाठी आधारवड ! मातृदिनी भाजपची कोल्हापूरकरांना अनोखी भेट! !शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी एस. व्ही. पाटील, उपाध्यक्षपदी गजानन कांबळे डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या स्वप्नील अलंगे यांची बीआयएसएजी-एनमध्ये निवडकोल्हापुरात महिलांच्यासाठी सर्व सुविधायुक्त वातानुकूलित स्वच्छतागृहे ! रविवारी होणार लोकार्पण !! खडके अकॅडमी बोरपाडळेचा दहावीचा सलग अकराव्या वर्षी शंभर टक्के निकालआबिटकर इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्केनूतन मराठी विद्यालयचा दहावीचा निकाल ८१ टक्केप्रकाश बेलवाडेंवर हल्ल्याचा प्रयत्न, एक जण जखमीकोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय ! तीन जिल्ह्यातील ९२८ शाळांचा निकाल शंभर टक्के ! !

जाहिरात

 

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कामगिरी भारी, शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत देशात प्रथम क्रमांक

schedule10 May 26 person by visibility 29 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्र सरकारने २०२४-२५ च्या शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकाचे गुणांकन प्रकाशित केले असून यामध्ये कोल्हापूर जिल्हयाने ६०० पैकी ४६३ गुण मिळवून सर्व राज्यामध्ये देशात प्रथम क्रमांक स्थान पटकावले आहे. राज्यातील दुस-या क्रमांकातील जिल्हयापेक्षा कोल्हापूर जिल्हा ५९ गुणांनी पुढे आहे.या यशाबद्दल शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पुणे येथे शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत कोल्हापूरच्या शिक्षण विभागाचे कौतुक केले. मंत्री भुसे यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांचा सत्कार झाला.

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक निर्देशांकामध्ये देशात अग्रस्थानी आणण्याचे मुख्य श्रेय जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, एस. यांचे आहे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर व जिल्हा डायटचे तत्कालीन प्राचार्य, डॉ. राजेद्र भोई, जिल्हा संगणक प्रोग्रॅमर घनःश्याम पुरेकर, सर्व गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, एमआयएस कॉ-ऑडीनेटर व डाटा एन्ट्री ऑपरेटर व सर्व समग्र शिक्षा अभियान कर्मचारी यांनी कोल्हापूर जिल्हयाच्या शैक्षणिक निर्देशांकामध्ये देशात अग्रस्थानी येण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

२०२४-२५ च्या शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर जिल्हा देशात द्वितीय क्रमांक मिळालेल्या यशाबद्दल पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी विजय राठोड, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील,  शिक्षण सभापती शितल यादव यांनी अभिनंदन केले. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने यापुढेही कोल्हापूर जिल्हा देशात अग्रस्थानी राहण्यासाठी काम करण्याचा निर्धार केला. याविषयी बोलताना शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी, ‘शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात ४८० गुणांचे ध्येय निश्चित केलेल्या "मिशन उत्कर्ष" उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन केले व नियोजनाप्रमाणे कार्यवाही होण्यासाठी वेळोवेळी आढावा घेतला. शिक्षण विभागाने अहोरात्र परिश्रम घेवून केलेल्या कार्याचे व सांघिक कामाचे यश आहे.’अशा भावना व्यक्त केल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes