महावीर कॉलेजच्या डॉ. रोहित पाटील यांच्या खेळातील संशोधनाला पेटंट
schedule13 Dec 24 person by visibility 77 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील महावीर महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक डॉ. रोहित पाटील यांनी सॉफ्टबॉलमध्ये केलेल्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. त्यानिमित्त शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू शिर्के व प्र कुलगुरू पी. ए. पाटील आणि त्यांचे कौतुक केले. यावेळी केएमसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब उलपे हे उपस्थित होते.
डॉ. पाटील यांनी सॉफ्टबॉल मध्ये बॉल पिचिंग करताना तो बरोबर की चूक याविषयी संशोधन करून एक डिवाइस निर्मिती केली. पिचरने टाकलेला चेंडू तो बरोबर की चूक हे पंचाच्या मोबाईल मध्येच दिसणार आहे. यासाठी त्यांनी केलेले संशोधन मंजूर केले असून नुकतेच त्यांना त्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
पश्चिमेत्य देशात फार खेळला जाणारा सॉफ्टबॉल व बेसबॉल या खेळामध्ये भारतात अजून म्हणावे तशी प्रगती झाली नाही. त्यामध्ये असणारे मैदान त्याचे साहित्य व त्याची किंमत हे पाहता हा खेळ अजून म्हणावा तसा भारतात रुजलेला नाही. परंतु गेली काही दशके हा खेळ राष्ट्रीय स्तरावर भारतात खेळला जातो.पाश्चिमात्य देशात या खेळामध्ये आधुनिकता दिसून येते. परंतु भारतात या खेळामध्ये पंचांच्या भूमिकेवर किंवा निर्णयावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, प्रत्येक सामन्यात किंवा अटीतटीच्या सामन्यात पंचांची भूमिका ही निर्णय ठरते याच गोष्टीवर मात करण्यासाठी या खेळामध्ये स्ट्राइक पिच व बॉल पीच मधील योग्य निर्णय उपकरणाद्वारे होणार आहे.
हे उपकरण हे सेन्सर्स व कॅमेराच्या मदतीने मुख्य पंचांच्या हातातील मोबाईल मध्ये व त्याचबरोबर संबंधित खेळाच्या मार्गदर्शकांच्याकडे येणार आहे. त्यामुळे या खेळात अधिक सुस्पष्टता व योग्य निर्णय होऊन हा खेळ वाढीस प्रेरणा मिळणार आहे. आचार्य रत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष के. ए. कापसे, सचिव एम. बी. गरगटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र लोखंडे यांचे त्यांना प्रोत्साहन लाभले.