+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustआजरीज इको व्हॅलीचे उद्घाटन समारंभ उत्साहात adjustखस्ता मातीशी नाळ जोडणाऱ्या ग्रामीण जीवनाचा ठाव घेणारी कादंबरी adjustआसगावकर यांच्या फंडातून वसतीगृह, निवासी शाळांना प्रिंटर वाटप adjustशिवसेना ठाकरे गटातर्फे शुक्रवारी महापालिकेवर धडक आंदोलन adjustहसन मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल साळोखेंचा पुढाकार adjustआमचं ठरलंयला उत्तर सभासदांनी ठरवलंयनी ! राजारामच्या आखाड्यात महाडिक –पाटलांचे शड्डू लागले घुमू !! adjustआमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा बुधवारपासून : सत्यजित जाधव adjustगावकऱ्यांनी गिरवले अर्थकारणाचे धडे : घोडावत विद्यापीठाचा 'अर्थ प्रबोधन' कार्यक्रम adjustशिवाजी विद्यापीठाला भुयारी मार्गासाठी आठ कोटी ४८ लाखाचा निधी मंजूर adjustदिलबहार पराभूत, झुंजार क्लब प्रथमच उपांत्य फेरीत
Screenshot_20230226_214758
Screenshot_20230217_165558
Maharashtra-News-1IMG-20200920-WA0002
schedule30 Jan 23 person by visibility 114 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
येथील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या शाहू छत्रपती केएसए वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढय पाटाकडील तालीम मंडळाला खंडोबा तालीम मंडळाने शून्य गोलबरोबरीत रोखले. ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ आणि संध्यामठ तरुण मंडळ यांच्यातील सामना शून्य गोलबरोबरीत सुटला. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
पाटाकडील आणि खंडोबा यांच्यातील सामना चुरशीचा झाला. पूर्वार्धात खंडोबाच्या संकेत मेढेने डी बाहेरुन मारलेला फटका गोलखांबाला तटला. पाटाकडीलच्या ओंकार मोरे, ओंकार जाधव, रोहित देसाई, रोहित पोवार आणि कैलास पाटी यांच्या चढाया दाद मिळवणाऱ्या ठरल्या. खंडोबाच्या निखिल खन्नाने उत्कृष्ट गोलरक्षण करत भक्कम बचाव केला. खंडोबाकडून कुणाल दळवी, संकेत मेढे, सागर पोवार, अबु बकर, प्रभू पोवार, दिग्विजय आसनेकर यांच्या चढाया दाद मिळवणाऱ्या ठरल्या. मध्यंत्तरास गोलफलक कोरा होता.
उत्तरार्धात दोन्ही संघांनी गोलची कोंडी फोडण्यासाठी धारदार चढाया केल्या. खंडोबाच्या प्रभू पोवारच्या पासवर गोल नोंदवण्याच्या दोन संधी अबु बकरने समन्वयाअभावी गमावल्या. पाटाकडीलच्या प्रतिक बदामेने फ्री कीकवर मारलेला वेगवान फटका गोलखांबाला तटला. व्हिक्टर जॉन्सनच्या पासवर ओंकार मोरेने गोल नोंदवण्याची संधी गमावली. पूर्णवेळेत सामना गोलशून्यबरोबरीत राहिल्याने दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण मिळविला.
ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ आणि संध्यामठ तरुण मंडळ यांच्यातील सामना शून्य गोलबरोबरीत राहिला. ऋणमुक्तेश्वरकडून अनिकेत कोळी, अथर्व मोरे, फ्रॅकी डेव्हिड तर संध्यामठकडून सौरभ हारुगले, स्वराज्य सरनाईक, यश जांभळे यांचा चांगला खेळ झाला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
…....
मंगळवारचे सामने, झुंझार क्लब वि. रंकाळा तालीम मंडळ, दुपारी २ वा. बालगोपाल तालीम मंडळ वि. जुना बुधवार पेठ तालीम मंडळ, दुपारी ४ वा.