पाटाकडील तालीम मंडळाने जिंकली चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा ! खंडोबा तालीम मंडळ उपविजेता !!
schedule29 Mar 26 person by visibility 31 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : अतिशय चुरशीच्या सामन्यांमध्ये पाटाकडील तालीम मंडळ संघाने खंडोबा तालीम मंडळ संघावर एक विरुद्ध शून्य गोलफरकाने विजय मिळवून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली. येथील शाहू स्टेडियम येथे रविवारी अंतिम सामना झाला श्री बालगोपाल तालीम मंडळ प्रायोजित या स्पर्धेसाठी फुटबॉल स्पर्धेसाठी फुटबॉल शौकीनानी प्रचंड गर्दी केली होती. पाटाकडील तालीम मंडळाकडून फुटबॉलपटू अमीन खजीरने विजयी गोल नोंदवला. सामन्याच्या उत्तरार्धात 80 व्या मिनिटाला फुटबॉलपटू नवी खानच्या पासवर त्यांनी हा गोल केला.
दरम्यान शिवसेनेच्या उपनेते व माजी आमदार जयश्री जाधव, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, उपमहापौर अक्षय जरग, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, नगरसेवक वैभव माने, विजय खाडे पाटील, रत्नेश शिरोळकर, इस्माईल बागवान, बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कुरणे, कार्याध्यक्ष निवास शिंदे, आप्पासाहेब साळोखे, व्यावसायिक जयेश ओसवाल, ओंकार जाधव, अश्फाक आजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बक्षीस समारंभ झाला. विजेत्या संघाला दोन लाख 31 हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित केले. अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून पाटाकडील तालीम मंडळाचा खेळाडू ओंकार मोरे हा ठरला. पाटाकडीलचा अक्षय पायमल हा बेस्ट डिफेन्स खेळाडू ठरला. स्पर्धेतील बेस्ट हाफ खेळाडू खंडोबा तालीम मंडळाचा रघु पवार ठरला. खंडोबा तालीमंडळाचा खेळाडू विष्णू टी एम हा बेस्ट फॉरवर्ड खेळाडू ठरला. स्पर्धेतील मालिकावीर म्हणून पाटाकडील तालीम मंडळाचा खेळाडू अमिन खजीर यांना गौरविण्यात आले. उपविजेता संघ खंडोबा तालीम मंडळाला एक लाख 31 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. दरम्यान अंतिम सामन्याचे उद्घाटन पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले.