Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संचालक म्हणून आम्ही प्राथमिक दूध संस्थांच्या पाठीशी, अदृश्य शक्तीचा डाव उधळून लावू- नविद मुश्रीफ अवसायन प्रकरण : प्राथमिक दूध संस्था आक्रमक, सोमवारी सहायक निबंधक कार्यालयावर मोर्चा वाणी-कृती-आचरण-निती-उच्चार शुद्ध असल्यास जगण्यात समाधान - इंद्रजीत देशमुखमहाराष्ट्राची प्रगतशील विचारधारा आणखी समद्ध करा - श्रीमती सरोज पाटील डॉ. मैनाक घोष सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी रुजूशिवाजी स्टेडियमची नव्याने बांधणी ! अंडरग्राऊंड पार्किंग - अंबाबाई मंदिरापर्यंत भुयारी मार्ग !! कोल्हापुरात रविवारी होमेसाकॉन परिषद - डॉ. राजकुमार पाटीलसांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची बदली, डॉ. मैनाक घोष नवे जिल्हाधिकारी32 वर्षाच्या सेवेनंतर प्रा. जयवंत दळवी शनिवारी सेवानिवृत्त होणारलोकप्रतिनिधींच्या पत्रावर दहा दिवसात कार्यवाही, गाव तिथं स्वच्छतागृह ! जिप अध्यक्षांचे सीईओंना पत्र

जाहिरात

 

अवसायन प्रकरण : प्राथमिक दूध संस्था आक्रमक, सोमवारी सहायक निबंधक कार्यालयावर मोर्चा

schedule29 Mar 26 person by visibility 153 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्ह्यातील बाराशेहून अधिक प्राथमिक दूध संस्था अवसायनात काढण्याच्या निर्णयाविरोधात, सोमवारी 30 मार्च 2026 रोजी कोल्हापुरात सहाय्यक निबंधक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता ताराबाई पार्क येथील धैर्य प्रसाद हॉल येथे प्राथमिक दूध संस्थांच्या प्रतिनिधींचा मेळावा आयोजित केला आहे.मेळावा झाल्यानंतर संस्था प्रतिनिधी सहाय्यक निबंधक दुग्ध विभागाच्या  कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करणार आहेत. हा मोर्चा गोकुळच्या संचालकांनी आयोजित केला आहे. प्राथमिक दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी रविवारी गोकुळच्या संचालकांची ताराबाई पार्क येथील कार्यालयात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. अवसायन यादीतून पात्र संस्थांची नावे वगळावेत आणि त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त व्हावा अशी मागणी  करण्यात आली.     "प्राथमिक दूध संस्थांचे म्हणणे सहायक निबंधक विभाग यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोमवारी मेळावा आणि मोर्चा आयोजित केला आहे. हा मोर्चा गोकुळने नव्हे तर संचालकानी व्यक्तिगत पातळीवर आयोजित केला आहे." असे संचालकांनी स्पष्ट केले. चेअरमन नवीद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अभिजीत तायशेटे, शशिकांत पाटील चुयेकर  प्रा. किसन चौगले, अजित नरके, अंबरीश घाटगे,  बाबासो चौगुले, रणजीत पाटील, नंदकुमार ढेगे, एस आर पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर,  अंजना रेडेकर, मुरलीधर जाधव, युवराज पाटील यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे हे काही कामानिमित्त रविवारी झालेल्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत मात्र सोमवारी आयोजित केलेला मेळावा व मोर्चाला ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती चेअरमन मुश्रीफ यांनी दिली.

 " गोकुळ दूध संघाशी संलग्न प्राथमिक दूध उत्पादक संस्था  या स्थापनेपासून सातत्याने गोकुळ दूध संघास दूध पुरवठा करत आहोत. अत्यंत दुर्गम, खेड्यापाड्यातील व डोंगरकपारी भागात कार्यरत असताना या संस्थांनी प्रामाणिकपणे काम करत गोकुळच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे.मागील निवडणुकांमध्ये आम्ही नियमाप्रमाणे आमचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तसेच नियमांनुसार लेखापरीक्षण, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व निवडणूक प्रक्रिया वेळोवेळी पूर्ण केलेली आहे.

सध्या  सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) कोल्हापूर विभागामार्फत  जिल्ह्यातील अनेक दूध संस्थांना अवसायन (लिक्विडेशन) संदर्भात नोटीस दिले आहेत. प्रत्यक्षात या संस्था नियमितपणे कार्यरत असून दूध संकलन व पुरवठा गोकुळ दूध संघास सुरळीत सुरू आहे. त्यामुळे आमच्या संस्थांचा अवसायन यादीमध्ये समावेश होणे ही अन्यायकारक व दुर्दैवी बाब आहे.

याचबरोबर काही व्यक्तींनी याचिकेद्वारे आमच्या संस्थांना “बोगस” ठरवण्याचा प्रयत्न केला आहे, जे पूर्णपणे चुकीचे व वस्तुस्थितीला धरून नाही. या आरोपांमुळे  संस्थांची प्रतिमा मलिन होत असून सभासदांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. विशेषतः आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या मतदान हक्काबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. नियमाने कार्यरत व पात्र असणाऱ्या संस्थांना पात्र ठरवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अवसायन यादीतून पात्र संस्थांची नावे वगळण्यासाठी संबंधित विभागाशी समन्वय साधावा, आमच्या संस्थांचा मतदान हक्क अबाधित ठेवण्यासाठी गोकुळ दूध संघाने ठोस भूमिका घ्यावी" असे निवेदनात म्हटले आहे.

 अब्दुल लाट येथील विद्याधर कुलकर्णी यांनी निवेदनाचे वाचन केले. गगनबावडा येथील दीपक पाटील, पन्हाळा तालुक्यातील भरत महिपती, विजय जाधव यांनी मनोगत व्यक्त करत असताना ग्रामीण भागातील प्राथमिक दूध संस्था टिकल्या पाहिजेत या दूध संस्था जर अवसायनात काढल्या तर त्या दूध कुठे घालणार? असा सवाल  त्यांनी केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes