Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पाटाकडील तालीम मंडळाने जिंकली चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा ! खंडोबा तालीम मंडळ उपविजेता !!कोल्हापूर-नवी मुंबई ! इंडिगो एअरलाईन्सची दिवसातून दोन वेळा विमान सेवा !!निरोगी आरोग्यासाठी होमिओपॅथीसुध्दा सक्षम पर्याय - डॉ. धर्मेंद्र शर्मा संचालक म्हणून आम्ही प्राथमिक दूध संस्थांच्या पाठीशी, अदृश्य शक्तीचा डाव उधळून लावू- नविद मुश्रीफ अवसायन प्रकरण : प्राथमिक दूध संस्था आक्रमक, सोमवारी सहायक निबंधक कार्यालयावर मोर्चा वाणी-कृती-आचरण-निती-उच्चार शुद्ध असल्यास जगण्यात समाधान - इंद्रजीत देशमुखमहाराष्ट्राची प्रगतशील विचारधारा आणखी समद्ध करा - श्रीमती सरोज पाटील डॉ. मैनाक घोष सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी रुजूशिवाजी स्टेडियमची नव्याने बांधणी ! अंडरग्राऊंड पार्किंग - अंबाबाई मंदिरापर्यंत भुयारी मार्ग !! कोल्हापुरात रविवारी होमेसाकॉन परिषद - डॉ. राजकुमार पाटील

जाहिरात

 

कोल्हापूर-नवी मुंबई ! इंडिगो एअरलाईन्सची दिवसातून दोन वेळा विमान सेवा !!

schedule29 Mar 26 person by visibility 56 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर-नवी मुंबई-कोल्हापूर या हवाई मार्गावर दिवसातून दोन वेळा इंडिगो एअरलाईन्सची विमान सेवा रविवारी 29 मार्च 2026 पासून सुरू झाली आहे. 

 या हवाई सेवेचा प्रारंभ खासदार महाडिक यांच्या हस्ते झाला. सकाळी साडेनऊ वाजता या विमानातून मुंबईला जाणार्‍या प्रवाशांना खासदार महाडिक यांनी शुभेच्छा देत, ही नवीन विमानसेवा दिवसातून दोन वेळा सुरू राहणार आहे.रविवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झालेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या पहिल्या विमानातून महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह अन्य प्रवाशांचे आगमन झाले. खासदा महाडिक यांनी या सर्वांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. तर याच विमानातून मुंबईला जाणार्‍या लोकमत माध्यम समुहाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांच्यासह अन्य प्रवाशांना बोर्डींग पास देवून शुभेच्छा दिल्या. या नव्या सेवेच्या विमानातून ६७ प्रवासी कोेल्हापुरात आले तर मुंबईला ६५ प्रवासी रवाना झाले. इंडिगो एअरलाईन्सचे हे विमान रोज सकाळी ८ वाजता नवी मुंबई विमानतळावरून टेकऑफ घेईल. तर ९ वाजून १५ मिनिटांनी कोल्हापुरात येईल. १५ मिनिटाच्या विश्रांतीनंतर ९ वाजून ३५ मिनिटांनी इंडिगोचे विमान नवी मुंबईच्या दिशेनं टेकऑफ घेवून १० वाजून २५ मिनिटांनी नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे. सायंकाळच्या सत्रात ७ वाजून २० मिनिटांनी नवी मुंबई विमानतळावरून टेकऑफ घेवून, रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर लँडिंग होईल. इथेही २० मिनिटाच्या विश्रांतीनंतर ८ वाजून ५० मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून टेकऑफ घेवून, रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी नवी मुंबईत पोचणार आहे. दरम्यान या हवाई सेवेच्या शुभारंभ प्रसंगी कोल्हापूर विमानतळ संचालक अनिल शिंदे, विमानतळ अधिकारी अनिल श्रीवास्तव, राजेश अहिरवार, बेनू नायक, अंकित व्यास, रविराज लामकाने, राजेश पेडणेकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes