संचालक म्हणून आम्ही प्राथमिक दूध संस्थांच्या पाठीशी, अदृश्य शक्तीचा डाव उधळून लावू- नविद मुश्रीफ
schedule29 Mar 26 person by visibility 105 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळशी निगडित असलेल्या जिल्ह्यातील बाराशेहून अधिक प्राथमिक दूध संस्थांना अवसायानात काढण्याचा घाट अदृश्य शक्तीनी घातला आहे. मात्र गोकुळचे संचालक म्हणून आम्ही सगळे त्या प्राथमिक दूध संस्थांच्या पाठीशी आहोत. प्राथमिक दूध संस्थाना मतदानाचा अधिकार मिळवून देऊ. तसेच त्या अदृश्य शक्तीचा डाव उधळून लावू . " अशा शब्दात गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी प्राथमिक दूध संस्थांच्या प्रतिनिधींना आश्वस्त केले.
सहकार निबंधक दुग्ध विभागाने जिल्ह्यातील बाराशे हुन अधिक प्राथमिक दूध संस्थांना अवसायानात काढण्याच्या नोटीस लागू केले आहेत. या प्रार्थनेतून संस्थांना गोकुळच्या मतदानापासूनही वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर संबंधित प्राथमिक संस्थांच्या प्रतिनिधींनी रविवारी सकाळी ताराबाई पारके तर गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात गोकुळचे चेअरमन व संचालक मंडळांची भेट घेतली. त्यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी बोलताना चेअरमन मुश्रीफ यांनी, " दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टावरच गोकुळची दिमाखात वाटचाल सुरू आहे. गोकुळच्या उभारण्यात दूध उत्पादक शेतकरी व प्राथमिक दूध संस्थांचा मोठा वाटा आहे. दरम्यान नियमांचा बागुलबुवा करत या प्राथमिक दूध संस्थाना गोकुळच्या निवडणुकीपासून वंचित ठेवण्याचा व त्या संस्था अवसायानात काढण्याचा डाव अदृश्य शक्तीने घातला आहे. मात्र आम्ही सगळे संचालक प्राथमिक दूध संस्थांच्या सोबत आहोत. त्यांना न्याय मिळवून देऊ तसेच त्या अदृश्य शक्तीचा डाव उधळून लावू. " याप्रसंगी संचालक विश्वास पाटील, अभिजीत तायशेटे, प्रा. किसन चौगुले, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासो चौगुले, अबरिश घाटगे, अजित नरके, अमरसिंह पाटील, नंदकुमार ढेगे एस.आर. पाटील, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, सुजित मिंणचेकर, रणजीत पाटील, अंजना रेडेकर, मुरलीधर जाधव, युवराज पाटील आदी उपस्थित होते.