डीवाय पाटील हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपण सेवेचा शुभारंभ
schedule02 Mar 24 person by visibility 418 categoryआरोग्य

अवयव प्रत्यारोपण सेवेद्वारे रुग्णाला पुनर्जन्म देणे शक्य- आमदार सतेज पाटील*
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
‘अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेले रुग्ण आणि अवयव दाते यांच्या संख्येत अतिशय तफावत आहे. ही तफावत दूर करण्यासाठी जनजागृती त्याचबरोबर सर्व रुग्णालयामध्ये अवयवदानाबाबत इकोसिस्टीम तयार होणे गरजेचे आहे. डीपीयू सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पिंपरीच्या सहयोगाने डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे सुरु केलेल्या अवयव प्रत्यारोपण ओपीडीच्या माध्यमातून मृत्युच्या दारात असलेल्या रुग्णाला पुनर्जन्म देणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन डी वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष, माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज डी. पाटील यांनी केले.
डीपीयू सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पिंपरीच्या सहयोगाने डी वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या अवयव प्रत्यारोपण ओपीडीच्या शुभारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी डीपीयू सुपर सपेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर ऑपरेशन्स डॉ संजय पठारे, हृद्य प्रत्यारोपण तज्ञ व हृद्यरोग विभाग प्रमुख डॉ. अनुराग गर्ग, आंतरराष्ट्रीय कर्डीओलोजीस्ट डॉ. विवेक मनाडे, फुफ्फुस रोपण तज्ञ डॉ. राहुल केंद्रे, डी वय पाटील एज्युकेशन सोसायटी सचिव श्रीपाद धरणगुत्ती, डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ, राकेश कुमार मुदगल, कृषी व तंत्र विद्यापीठ कुलगुरू डॉ के प्रथपन, कार्यकारी संचालक डॉ ए . के. गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ही ओपीडी सुरू राहणार आहे. यामध्ये हृदय, फुफ्फुस प्रत्यारोपणा संबंधित तपासण्या होणार असून आवश्यकता भासल्यास पुणे येथील डीपीयु हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी प्रास्ताविक केले. डॉ. डॉ.कुणाल ताशीलदार यांनी आभार मानले.
मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, कुलसचिव व्ही. व्ही भोसले, डॉ. शिंपा शर्मा, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. राजेश ख्यालाप्पा, उपकुलसचिव संजय जाधव, सीएचआरओ श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. अजित पाटील, प्राचार्य डॉ. अमृतकुवर रायजादे, प्राचार्य डॉ उमाराणी जे., प्राचार्य रुधिर बारदेसकर उपस्थित होते.