Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक -पदवीधर मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 23 ऑक्टोबरला मतदानपुणे पदवीधर- शिक्षकसाठी महायुतीतील पक्षांची वाटचाल स्वतंत्रपणे लढण्याकडे ! मंत्र्यांच्या विधानांनी मैत्रीपूर्ण लढतीचे चिन्हे अधिक !!कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव, रसिकांसाठी प्रवेश विनामूल्यइंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे गुरुवारी राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळापशुधनासाठी विमा योजना, पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभप्राधिकरणच्या सीईओंच्या कामकाजाची चौकशी करा,  आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुख्य सचिवांना पत्रमहायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ 24 सप्टेंबरला ! आठ ऑक्टोबरला पॅनेलची घोषणा, अदृश्य शक्ती लुप्त झाली !!गोकुळच्या संचालक पदासाठी आमदारही मैदानात, अशोक माने यांचा अर्ज दाखलगोकुळसाठी भाजपचे शक्ती प्रदर्शन, २५ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल ! इच्छुक वाढल्याने यादी लांबली !!रविकिरण इंगवलेंना तत्काळ अटक करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणी

जाहिरात

 

डीवाय पाटील ग्रुपमधील २३० विद्यार्थ्यांना मेरीट स्कॉलरशिप प्रदान 

schedule18 Jan 26 person by visibility 389 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून दिली जाणरी ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप’ ही गुणवंत विद्यार्थ्याला मिळणारी केवळ आर्थिक मदत नसून, ती त्याच्या आयुष्यात आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि आशेचा नवा प्रकाश निर्माण करेल, त्यांना नवी उर्जा व प्रेरणा मिळेल,  असे प्रतिपादन डीएमआयएचईआरचे प्रो-चॅन्सलर व चीफ अ‍ॅडव्हायझर डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले

तळसंदे येथील डॉ. डी वाय पाटील एज्युकेशनल सिटी येथे शांतादेवी डी. पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पद्मश्री डॉ डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच २३० विद्यार्थ्यांना ‘सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप’चे वितरण करण्यात आले. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिश्रा बोलत होते.डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी. पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

डी वाय पाटील विद्यापीठ,पुणे चे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र.कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, मेघराज काकडे, शांतीनिकेतनच्या संचालिका राजश्री काकडे, उपाध्यक्ष व  आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस  पाटील व देवश्री पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या स्कॉलरशिप योजनेबद्दल सविस्तर माहिती देऊन भविष्यातील योजनांबाबत माहिती दिली. डॉ. संजय डी.पाटील म्हणाले की,  गुणवत्ता पूर्ण शिक्षण, उत्तम पायाभूत सुविधा,  नवनवे अभ्यासक्रम व संशोधन यावर आमचा विशेष भर आहे. तळसंदे येथील या कॅम्पसमध्ये ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण घेत आहेत. सौ शांतादेवी डी. मेरीट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी निकोप स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून अधिकाधिक  गुणवंत विद्यार्थी घडतील याची खात्री आहे.

यावेळी वैजयंती संजय पाटील,  पूजा ऋतुराज पाटील,  वृषाली पृथ्वीराज पाटील, भारत चव्हाण पाटील, श्वेता पाटील,  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा,  डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डीचे कुलगुरू डॉ. मनीष भल्ला, डी. वाय. पाटील  कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए, के, गुप्ता,   डॉ. पी. बी. साबळे, डॉ. भालबा विभुते,  सी. एच आर ओ. श्रीलेखा साटम,  मानसिंगराव पाटील, देवराज पाटील उपस्थित होते. डॉ. रेणुका तुरंबेकर, डॉ. मारुती देवकर यांनी सूत्रसंचालन केले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes