+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule05 Sep 22 person by visibility 743 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : विसर्जित मूर्ती दान व निर्माल्य दान उपक्रमाला यंदाही जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला. भाविकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवच साजरा करत बाप्पाला निरोप दिला. दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत एकूण दोन लाख ५८ हजार ९३२ मूर्ती संकलित झाल्या तर ५१६ टन निर्माल्यचे संकलन झाले आहे, असे जिल्हा परिषदेने कळविले आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमांतर्गत १९८६ गणेशमूर्तींचे विजर्सन हे घरच्या घरीचं करण्यात आले. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती तसेच जिल्हयातील जलस्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या हेतूने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होता. या वर्षी ही जिल्हयातील सर्व गावांनी यामध्ये सहभाग घेतला.
या उपक्रमामध्ये जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी होवून जलस्त्रोत प्रदूषण मुक्त ठेवण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी केले होते.
या उपक्रमाबाबतच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बैठकांच्या माध्यमातून उपक्रमाचे नियोजन केले होते. उपक्रम यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग व ग्राम पंचायत स्तरावर पर्यायी व्यवस्थांची निर्मिती करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना समन्वयासाठी जबाबदारी सोपविल्या होत्या. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमासाठी स्थानिक लोकप्रतिनीधी, स्वयंसेवी संस्था, तरूण मंडळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती आणि ग्राम पंचायत स्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. उपक्रमाचे आयोजन पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले