मंत्री प्रकाश आबिटकरांचे राधानगरी मतदारसंघात जंगी स्वागत करणार, गारगोटीत नियोजन बैठक
schedule19 Dec 24 person by visibility 48 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मंत्री प्रकाश आबिटकर हे शनिवारी (२१ डिसेंबर २०२४) रोजी राधानगरी विधानसभा मतदार संघात येत आहेत. त्यांचे मतदार संघामध्ये जंगी स्वागत करू या असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले.
मंत्री आबिटकर यांच्या स्वागताच्या नियोजनासंदर्भात गारगोटी येथे बैठक झाली. याप्रसंगी ते बोलत होते. महायुतीचे दोन्ही मंत्री हसन मुश्रीफ व प्रकाश आबिटकर हे कोल्हापूर येथे सकाळी दहा वाजता येणार आहेत. ताराराणी चौक, कावळा नाका येथे जंगी स्वागत होणार आहे. तसेच ताराराणी चौकातून कोल्हापूर येथील निघणार आहे. रॅलीची सांगता शाहू महाराजांच्या समाधिस्थळाजवळ करणात येणार आहे.
दरम्यान मंत्री आबिटकर यांच्या मतदार संघातील रॅलीची सुरवात शेळेवाडी (ता.राधानगरी) येथून होणार आहे. तुरंबे येथील गणेशाचे दर्शन घेणार आहे. यानंतर रॅली गारगोटी शहरात येऊन येथील क्रांतीसिंह नाना पाटील व्यासपीठाजवळ नागरी सत्काराचे आयोजन केले आहे. नियोजनाच्या बैठकीत शिवसेना भुदरगड तालुकाप्रमुख संग्राम सावंत यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. आजरा तालुकाप्रमुख संजय पाटील यांनी अनुमोदन दिले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी स्वागताचे नियोजन सांगितले. कल्याणराव निकम यांनी प्रास्ताविक केले जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबा नांदेकर यांनी आभार मानले.
यावेळी गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, माजी उपसभापती अरुणराव जाधव, बाजार समिती संचालक संदीप वरंडेकर, अशोक फराकटे, मदन देसाई, अशोक भांदिगरे, अलकेश कांदळकर, सर्जेराव देसाई, अंकुश चव्हाण, दिपक शेट्टी, शिवसेना राधानगरी तालुकाप्रमुख तानाजीराव चौगले, अमित देसाई, दौलतराव जाधव, विद्याधर परीट, सुभाष पाटील मालवेकर, शिवाजीराव ढेंगे, दशरथ अमृते, विलास नाईक, विजय पाटील आदी उपस्थित होते.