भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या फायनान्स कमिटीच्या उपाध्यक्षपदी मालोजीराजे, महिला समिती सदस्यपदी मधुरिमाराजे
schedule19 Sep 22 person by visibility 541 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी कोल्हापूर:
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन फायनान्स समितीवर मालोजीराजे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. एआयएफएफचे अध्यक्ष कल्याण चोबे यांच्या अध्यक्षतेखाली कोलकत्ता येथे झालेल्या कार्यकारिणी मंडळाच्या सभेत निवड झाली. मालोजीराजे यांची स्पर्धा समितीवर सदस्य म्हणूनही निवड झाली.
याचबरोबर १७ वर्षाखालील मुली जागतीक फुटबॉल स्पर्धेच्या अंतर्गत महाराष्ट्रात होणाऱ्या सामन्यांसाठी एआयएफएफचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून निवड करणेत आली. अशाप्रकारे वरील महत्त्त्वाच्या तीन समित्यावर कामकाज करण्याचा बहुमान मालोजीराजे यांच्यामुळे कोल्हापूरला पहिल्यांदाच मिळाला आहे.
याच सभेमध्ये के.एस.ए.च्या पेट्रन मधुरिमाराजे यांनी महाराष्ट्राच्या फुटबॉल क्षेत्रात केलेल्या कार्याची विशेष नोंद घेऊन त्यांची एआयएफएफ महिला समिती सदस्या म्हणून पुन्हा निवड झाली.
मालोजीराजे व मधुरिमाराजे यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. केएसएचे पेट्रन-इन्-चीफ श्रीमंत शाहू छत्रपती व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष- प्रफुल्ल पटेल यांचे मार्गदर्शन लाभले.