कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी नेत्यांचे मतदान ! काँग्रेस - भाजप कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक! !
schedule15 Jan 26 person by visibility 10 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी, पंधरा जानेवारी २०२६ रोजी चुरशीने मतदानाला सुरुवात झाली. कोल्हापूर शहरातील २० प्रभागातील ८१ नगरसेवक जागेसाठी ३२७ उमेदवार रिंगणात आहेत. गेले पंधरा दिवस आरोप, प्रत्यारोपाचा धुरळा उडवून देणाऱ्या नेतेमंडळींनी महापालिका निवडणुकीसाठी सकाळच्या सत्रात मतदान केले. ‘कोल्हापूरच्या विकासासाठी नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा.लोकशाही बळकटीसाटी आणि कोल्हापूरच्या भविष्यासाठी साऱ्या मतदारांनी मतदान करावे.’असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान शहरातील एका मतदान केंद्रावर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी ५९५ मतदान केंद्रांची सुविधा आहे. एकूण मतदार चार लाख ९७ हजार ७११ इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या दोन लाख ४४ हजार ७३४ तर महिला मतदारांची संख्याग् दोन लाख ४९ हजार ९४० इतकी आहे. दरम्यान कोल्हापुरात पहिल्या दोन तासात जवळपास दहा टक्के मतदान झाले. सकाळी साडेसात ते साडेनऊ या पहिल्या दोन तासांमध्ये ९.६४ टक्के मतदान झाले. यामध्ये पुरुषांचे मतदान २७ हजार २५० तर महिला मतदारांची संख्या वीस हजार ४४७ इतकी आहे.
भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रुईकर कॉलनी, दत्त मंदिरासमोरील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी मतदान केले. मतदानाच्या प्रक्रियेत नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी सकाळच्या सत्रात मतदान केले. कुटुंबींयांसहित त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी, कसबा बावडा येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.. मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना महायुतीवर टीकास्त्र सोडले. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीचा जो कार्यक्रम झाला, तो स्क्रिप्टेड होता.’अशा शब्दांत चिमटा काढला.