Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रामशेठ ठाकुरांनी दिली श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसला पंचवीस लाखाची देणगीमहात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा - प्राचार्य जी. पी. माळीजिल्हातंर्गत काँग्रेसमध्ये होणार फेरबदल, पदाधिकारी नेमणुकीसंदर्भात आढावा बैठकडॉ. बापूजी साळुंखे  इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उलगडली भारतीय वायुदलातील करिअरची संधी  घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसक्तीच्या टीईटी परीक्षेतून सवलत मिळण्यासाठी खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार - खासदार धैर्यशील मानेआरोग्य विभागात साफसफाई ! जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, सुप्रिया देशमुख निलंबित !!महामानवाच्या द्विजन्मशताब्दीचा सरकारला विसर ! क्रांतिबा जोतिबांचा वापर राज्यकर्त्यांकडून केवळ भाषणापुरताच ! !अशक्य ते शक्य करतात मुश्रीफ ! रामायणात दहा तोंडाचा रावण, बाजार समितीत अठरा तोंडाची रावणं !!कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी नानासो कांबळे-साकेकर

जाहिरात

 

महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी ललित गांधी,  सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड !

schedule23 Jun 25 person by visibility 499 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार, कृषि उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून कार्य करणाऱ्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’च्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध फेरनिवड झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्यांना प्रेसीडेन्शीअल कप प्रदान करून अध्यक्षपदाचा कार्यभार प्रदान करण्यात आला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा संख्येने उपस्थित होते.

गृहमंत्री शहा म्हणाले, ‘ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातुन येत्या शंभर वर्षासाठीचे नियोजन करावे व व्यावसायिक कार्यपध्दतीचा अवलंब करावा असे सांगुन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा व अनुभवाची शक्ति ही येणार्‍या काळातील विकासासाठी महत्वाची ठरेल.’

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चर संस्थेने उद्योग, व्यापार आणि शेतीच्या क्षेत्रात नवे उद्यमी तयार करण्याची मुहूर्तमेढ रोवली. देशात अनेक चेंबर ऑफ कॉमर्स/इंडस्ट्री नाव असलेल्या संस्था आहेत. पण कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चर असे एकत्रित नाव असलेली ही एकमेव संस्था आहे. शेठ वालचंदजी यांनी रोपटे लावलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चर या संस्थेचे आताचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वात या संस्थेसाठी १०० वे वर्ष ऐतिहासिक ठरेल. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्र चेंबरच्या वैभवशाली परंपरेचा गौरवपूर्ण उल्लेख करून चेंबरने विकासात केलेल्या सहभागाबद्दल चेंबरचे अभिनंदन केले.

……………

“केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पदभार स्वीकारणे या आयुष्यातील सर्वात गौरवपूर्ण घटना आहे. सर्व मान्यवरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आगामी काळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्राच्या उद्योग व्यापार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी, या क्षेत्राचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून प्रभावी नेतृत्व करू.”

-ललित गांधी, अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes