Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मॅकच्या अध्यक्षपदी मोहन कुशिरे, उपाध्यक्षपदी विठ्ठल पाटील  डिबेंचर कपातीवरुन गोंधळ, जनावरांसहित गोकुळवर धडक ! आंदोलक-पोलिसात झटापट !!प्रशासक उतरल्या रस्त्यावर, दर्जाहीन कामांमुळे शहर अभियंता रमेश मस्करसह पाच जणांना  नोटीस !अरुण जाधवांच्यावर विभागीय चौकशीची टांगती तलवार, आणखी एक कर्मचारीही चर्चेत ! ग्रामविकास विभागाकडे चौकशी अहवाल!!डिबेंचर कपातीच्या विरोधातील मोर्चात शौमिका महाडिक सहभागी होणारसुरेश शिपूरकर, शैलजा साळोखे यांना ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कारवाचन प्रेरणा दिनी ग्रंथ भेट , शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा हटके उपक्रम !कोल्हापुरात धक्कादायक घटना, मुलाने केला आईचा खूनमहापालिकेचे शैक्षणिक व्हिजन, शाळा विकासासाठी नऊ समित्या ! ७० शिक्षकांचा सहभाग, विद्यार्थ्यांना जर्मन-फ्रेंच-स्पॅनिश भाषांची तोंड ओळख !!संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा महत्वाच्या : पोलिस अधिकारी प्रिया पाटील

जाहिरात

 

चार प्रभागात कृष्णराज महाडिकांनी वाढविला विकासकामांचा श्रीफळ

schedule11 Jan 25 person by visibility 567 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सर्व वॉर्डामध्ये अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनची पायाभूत सुविधा निर्माण करून नागरिकांना उत्तमोत्त सुविधा देण्यासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक प्रयत्नशील आहेत. खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विविध प्रभागातील कामे करण्यात येत आहेत. या अंतर्गत भोसलेवाडी -कदमवाडी मध्ये योगेश पाटील घर ते मंडलिक घर रस्ता डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचा शुभारंभ महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक संजय निकम, चंद्रकांत घाटगे, वैभव माने, उमेश माने, धीरज पाटील, किशोर पवार, प्रवीण वाघमारे, सोनल वाघमारे, पंकज किडगावकर उपस्थित होते. कैलासगडची स्वारी मंदिर प्रभागातील परिसरात मंगळवार पेठेतील सुबराव गवळी तालीम पासून ते पद्मावती चौकापर्यंतच्या ड्रेनेज लाईनचे काम नगरोत्थान महाअभियानांतर्गत २० लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभही कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला संतोष महाडिक, अभिजीत पाटील, प्रसाद जाधव, संपत जाधव, उदय पाटील, निवास शिंदे, बाळासाहेब पाटील, मिलिंद गुरव कुणाल शिंदे, युवराज कुरणे, आर्यनील जाधव, आणि श्रीधर पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.  

सर्किट हाऊस प्रभागातील  अग्निहोत्री घर ते ईगल पाईप रस्ता, कापसे कॉलनी मार्गाचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचा शुभारंभ महाडिक यांच्या हस्ते झाला. यावेळी संजय निकम, सुनील नाणिवडेकर, महावीर मंगदुम, अ‍ॅड. डी. बी. कापसे, एन.जी. पाटील आणि अजिंक्य तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान प्रभाग क्रमांक ६२ बुध्द गार्डन परिसरातील आयडीयल सोसायटीमध्ये अशोक साळोखे यांच्या घरापासून ते रेसिडेन्सि मित्र मंडळापर्यंतच्या मार्गावर गटार बांधकामासाठी २० लाख रुपये निधी देण्यात आला आहे. त्याचीही सुरूवात कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाली. या शुभारंभ वेळी रणजित कांबळे, रविकिरण गवळी, प्रेम रजपुत, मोहन जाधव, मंगलताई निपाणीकर, राजू खडके, जय खडके, सुनिल देशपांडे, सनी आवळे, महेश खडके, महेश जाधव, अभि सावंत, प्रभूराज भोसले उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes