कृष्णराज महाडिक यांच्या युवाशक्ती जागर यात्रेचे सिंधुदुर्गमध्ये जल्लोषी स्वागत
schedule26 Apr 26 person by visibility 50 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यातील युवा वर्ग भाजपशी जोडला जावा आणि पक्षाची ध्येय, धोरणं समाजाच्या तळागाळापर्यंत पोचावीत, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने युवाशक्ती जागर यात्रा सुरू करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सिंधुदुर्ग जिल्हयात पोचली. यावेळी कार्यकर्त्यांनी या यात्रेचे जल्लोषी स्वागत केले. या दरम्यान महाडिक यांनी कणकवली मध्ये मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. युवा जागर यात्रेच्या उपक्रमाचे नामदार नितेश राणे यांनी कौतुक केले. युवाशक्ती जागर यात्रेचा हेतू आणि राज्यभर मिळणारा प्रतिसाद, याबाबत महाडिक यांनी राणे यांना सविस्तर माहिती दिली. त्यावर संपूर्ण राज्याचा कानाकोपरा या यात्रेद्वारे पिंजुन काढा आणि समाजातील सर्वच घटकांना विशेषत: युवा वर्गाला भाजपच्या विचारधारेत आणण्यासाठी जोमाने प्रयत्न करा, असा सल्ला राणे यांनी दिला. या दरम्यान युवाशक्ती आणि भाजपच्या पदाधिकार्यांचा मेळावाही पार पडला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस संदीप साठम, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखम राजेभोसले, सभापती प्रितेश राऊळ, मिलींद मेस्त्री, अशोक सामंत, श्वेता कोरगांवकर, दिलीप तळेकर उपस्थित होते.