+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे.
Screenshot_20240226_195247~2
schedule07 Mar 24 person by visibility 140 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
येथील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने झुंजार क्लबचा ३-१ तर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ संघावर १-० असा निसटता विजय मिळवला. पाटाकडील तालीम मंडळाने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
फुलेवाडी आणि जुना बुधवार यांच्यातील सामना चुरशीचा झाला. पूर्वार्धात दोन्ही संघानी गोल नोंदवण्याचे जोरदार प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. मध्यंतरास सामना गोलशून्य बरोबरीत होता.
उत्तरार्धात ६७ व्या मिनिटाला फुलेवाडीच्या रोहित जाधवने वेगवान फटक्याद्वारे गोल करत संघास आघाडी मिळवून दिली. परतफेड करण्यासाठी जुना बुधवारने जोरदार चढाया केल्या. त्यांच्या संकेत कांबळेचा फटका गोलक्षकाच्या हातात गेला. शेवटच्या मिनिटाला फुलेवाडीच्या गोलक्षेत्रात उडालेल्या गोंधळाचा फायदा जुना बुधवार संघांला उठवता आला नाही. एक गोलची आघाडी कायम टिकवत फुलेवाडीने सामना जिंकला. त्यांच्या रोहित जाधवची सामनावीर तर जुना बुधवारच्या राहूल कडकल याची लढवय्या खेळाडू म्हणून निवड झाली.
तत्पूर्वी दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यात खंडोबा आणि झुंजार यांच्यातील सामन्यात दोन्ही संघ गोल करू न शकल्याने मध्यंतरास गोल फलक कोरा होता. उत्तरार्धात खंडोबाने जोरदार चढाया केल्या पण गोलची कोंडी फुटत नव्हती. ६८ व्या मिनिटाला सुधीर कोटीकाला याने खंडोबाचा पहिला गोल केला. ७३ व्या मिनिटाला संकेत मेढेने तर जादा वेळेत ८२ व्या मिनिटाला प्रभू पोवार याने गोल केला. जादा वेळेत ८४ व्या मिनिटाला संध्यामठच्या अवधूत पाटोळेने गोल केला. खंडोबाने ३-१ अशा फरकाने सामना जिंकला. त्यांच्या पॄथ्वीराज साळोखे याची सामनावीर तर संध्यामठच्या मसूद मुल्ला याची लढवय्या खेळाडू म्हणून निवड झाली.
शुक्रवारचे सामने
शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ, दुपारी दोन वाजता. दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ब, दुपारी चार वाजता.