गणपतराव देशमुखांच्यावर आधारित कर्मयोगी सिनेमा आजपासून प्रदर्शित
schedule25 Oct 24 person by visibility 167 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या जीवनकार्याचा वेध "कर्मयोगी आबासाहेब" या चित्रपटातून घेतला आहे. हा सिनेमा २५ ऑक्टोबर २०२४ पासून मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार व तंत्रज्ञ टीमने कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला.
मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती तुळशीराम बनकर, बाळासाहेब महादेव एरंडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचं लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी निभावली आहे. कुणाल गांजावाला, मनीष राजगिरे यांनी गाणी गायली आहेत. चित्रपटात अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घनश्याम दरोडे, अहमद देशमुख, वृंदा बाळ, निकिता सुखदेव,अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कार्यकारी निर्माता अमजद खान शेख असून प्रोडक्शन कंट्रोल सय्यद दादासो शेख यांनी काम पाहिले आहे.
"कर्मयोगी आबासाहेब" या चित्रपटातून मा. गणपतराव देशमुख यांच्या हळव्या, कर्तव्यकठोर, कृतीशील, विचारी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यात आला आहे. अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येताना त्यांनी केलेला संघर्ष, त्यातलं राजकारण उलगडतानाच त्यांनी केलेला विकास, सुधारणा, शेतकरी, वंचित घटकांसाठीचं काम दाखवण्यात आलं आहे. त्यामुळेच जनतेनं आबासाहेबांवर अलोट प्रेम केलं. या सर्वांचं दर्शन "कर्मयोगी आबासाहेब" या सिनेमातून घडणार आहे.