Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भविष्यात गोकुळचे गाय दूध गोव्यात थेट ग्राहकांपर्यंत ! चेअरमनसह संचालकांची मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत चर्चा !!पालकमंत्र्यांचा शेतीशी नातं जोडणारा उपक्रम, माझा एक दिवस-माझ्या बळीराजासाठी !बबेराव जाधवांच्या पायवाटेवरूनच पुढे जाण्याचा आमचा संकल्प – माजी आमदार जयश्री जाधव आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून डॉ. रविकुमार जाधव जीवनगौरव पुरस्कारांनी सन्मानितनाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद अष्टेकर, कार्याध्यक्षपदी आनंद कुलकर्णीराष्ट्रवादी शरद पवार पक्षाची कोल्हापुरात शनिवारी बैठकउद्धव ठाकरेंची भेट, पण संजय पवारांची नाराजी कायम ! प्रामाणिकपणाचे फळ म्हणून जिल्हाप्रमुखपदी निवड-रविकिरण इंगवलेसावकार मादनाईक भाजपात दाखल, शिरोळमध्ये भाजपाला मिळाला नवा नेताविद्यापीठातील औद्योगिक रसायनिक शास्त्रमधील विद्यार्थ्यांची निवड 

जाहिरात

 

करवीरमध्ये उभारणार इंडस्ट्रीयल पार्क, गुऱ्हाळघरांना चालना  –संताजी घोरपडे

schedule08 Nov 24 person by visibility 235 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघात गेल्या वीस वर्षात जे काम झाले नाही ते निवडून आल्यानंतर या भागाच्या विकासासाठी करणार आहे. करवीर मतदारसंघात इंडस्ट्रीयल पार्क, पारंपरिक गुऱ्हाळ उद्योगाला चालना दिली जाईल’अशी ग्वाही करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांनी दिली.

 करवीर मतदारसंघात घोरपडे हे जनसुराज्य शक्तीपक्षाद्वारे निवडणूक लढवित आहेत. त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. प्रत्यक्ष गाठी भेटी, संपर्क दौरा या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचत आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघासाठी भरीव काम करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

घोरपडे म्हणाले, ‘मतदारसंघाच्या विकासाचा आपल्याकडे मॅप आहे.करवीर मतदारसंघात आजपर्यंत रस्ते आणि गटारीचे राजकारण झाले. त्या पलीकडे मतदारसंघाचा विकास करायचा आहे. मतदारसंघात इंडस्ट्रीयल पार्क, गुऱ्हाळ उद्योगाला चालना, खेळाडूंसाठी क्रीडा संकुल, तरुणाईला स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी वाचनालये अशा विविध पातळीवर काम करायचे आहे.’

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes