पहिल्या फेरीतील पहिल्या गटात सत्ताधारी आघाडीवर
schedule25 Apr 23 person by visibility 1224 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दोन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या पहिल्या टप्प्यात एक ते 29 मतदान केंद्रावरील मतमोजणी होत असून पहिल्या फेरीतील पहिल्या गटांमध्ये सत्ताधारी महाडिक आघाडीला मताधिक्य आहे. साधारणपणे 700 ते 800 मतांचे आघाडी आहे. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी आघाडीच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडी यांच्यामध्ये थेट लढत आहे.
पहिल्या फेरीतील पहिल्या तीन गटातील मतमोजणी मध्ये हातंगले तालुक्यातील बहुसंख्य मतदान केंद्रावर महाडिक आघाडीला चांगले मताधिक मिळाले आहे करवीर तालुक्यातील काही गावांमध्येही महाडिक आघाडीने विरोधी आघाडीपेक्षा चांगली मते घेतले आहेत.