+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे.
Screenshot_20240226_195247~2
schedule15 Mar 24 person by visibility 135 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
यजमान पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर ४-१ असा विजय मिळवत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सोमवारी १८ मार्च रोजी शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ अ संघात अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
शाहू स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या लढतीत पाटाकडील विरुद्ध फुलेवाडी संघाने पहिल्या गोलची नोंद केली. सामन्याच्या अकराव्या मिनिटाला संकेत असनेकरने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. या गोल नंतर परतफेड करण्यासाठी पाटाकडील तालीम मंडळाचा झंझावात सुरू झाला. २६ व्या मिनिटाला अक्षय पायमलने मैदानी गोल करत सामना१-१ असा बरोबरीत आणला. मध्यंतरापुर्वी ज्यादा वेळेत आदित्य कल्लोळीने गोल करत पाटाकडील संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात ४३ व्या मिनिटाला आदित्य कल्लोळीने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल नोंदवला. तीन गोलच्या आघाडीमुळे फुलेवाडी संघाचा खेळ विस्कळीत झाला. त्याचा फायदा घेत ७६ व्या मिनिटाला ओमकार मोरे याने पाटाकडीलचा चौथा गोल नोंदवला. तीन गोलची घसघशीत आघाडी कायम टिकवत पाटाकडीलने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पाटाकडीलच्या आदित्य कल्लोळीची सामनावीर तर फुलेवाडीच्या संकेत येसनेकर याची लढवय्या खेळाडू म्हणून निवड झाली.