Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गुरु-शिष्य प्रदर्शनाचा १५ रोजी प्रारंभ ! दुर्गा आजगावकर यांना युवा कलाकार पुरस्कार!!जिल्हा परिषद काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ पाटीलमहायुती म्हणून लढणार, पण नेतृत्व कोणाकडे ? भाजप- राष्ट्रवादीत चढाओढ!!राष्ट्रवादीची वेळ चुकली, शिवसेनेचा परिवहन सभापतीवर निशाणागोकुळची निवडणूक हलक्यात घेऊ नका…! – शौमिका महाडिकांचे तडाखेबंद भाषणगोकुळच्या निवडणुकीत महायुतीलाच कौल मिळेल, विरोधकांचा एकही संचालक निवडून येणार नाही-धनंजय महाडिकणण छअनेक दिवसांचे स्वप्न साकारण्याच्या मार्गावर…आयटी पार्कसाठी शेंडापार्कमध्ये ३४ हेक्टर जागा मंजूरशहीद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे निसर्गदूत पुरस्कार जाहीर, शनिवारी वितरण समारंभअर्जुनवाडा येथे रंगणार सुपर मॉम स्पर्धा

जाहिरात

 

गुरु-शिष्य प्रदर्शनाचा १५ रोजी प्रारंभ ! दुर्गा आजगावकर यांना युवा कलाकार पुरस्कार!!

schedule07 Mar 26 person by visibility 10 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन, प्रतिनिधी कोल्हापूर : रेखासम्राट टी. के. वडणगेकर यांच्या  २६ व्या स्मृतिदिनानिमित्त सातत्यपूर्ण ‘गुरु शिष्य’ उपक्रमांतर्गत कलाप्रदर्शनाचा प्रारंभ  १५ मार्च 2026 रोजी सकाळी १०.३० वाजता शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे होणार आहे. या सोहळ्यात दुर्गा आजगावकर यांना के. आर. कुंभार उपक्रमशील युवा कलाकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटक शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव असून शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, आर्किटेक्ट गजेंद्र साबळे यांची प्रमुख उपस्थिती असेल. पुरस्काराच्या मानकरी दुर्गा आजगावकर यांनी ‘दळवीज् आर्ट इन्स्टिट्यूट’ येथून अभिजात चित्रकला (पेंटिंग) मध्ये पदविका, त्यानंतर  इतिहास विषयात पदवी  उत्तीर्ण होऊन पुढील पदव्युत्तर  शिक्षण प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व या विषयांत ‘डेक्कन कॉलेज पुणे’ येथून पूर्ण केले. गेली साडे ४ वर्षे पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संशोधन अभ्यासक म्हणून कार्यरत आहे. यामध्ये झपुर्झा म्युझियम ऑफ आर्ट आणि कल्चर पुणे आणि नंतर ’प्लीच इंडिया फौंडेशन, हैदराबाद यांचा समावेश होतो. तर तेलंगणा राज्य पुरातत्व संग्रहालय, श्री व्यंकटेश्वर संग्रहालय (तिरुपती-बालाजी) तिरुमाला, आंध्रप्रदेश येथे स्थित ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संग्रहालयांसाठी तसेच काही खाजगी कला संग्रहालये आणि ऐतिहासिक संस्थांसाठी काम केले आहे. विविध प्रदर्शनात पुरस्कार मिळाले आहेत.
या कलाप्रदर्शनामध्ये गुरुशिष्य प्रदर्शन विजय टिपुगडे विलास बकरे, अजेय दळवी, संतोष पोवार मनोज दरेकर, बबन माने, नागेश हंकारे, अभिजीत कांबळे, प्रवीण वाघमारे, गजेंद्र वाघमारे, पूनम राऊत, शुभम चेचर, दुर्गा आजगावकर, विजय उपाध्ये, राज इंचनाळकर, पुष्कराज मेस्त्री, सुदर्शन वंडकर, सर्वेश देवरुखकर, शैलेश राऊत, भाऊसो पाटील, रमजान मुल्ला, शुभम कुंभार, ओंकार कोळेकर, ज्ञानेश पोवार, प्रकाश मोहिते, राहुल रेपे, आरिफ तांबोळी, सौरभ भोगटे, धोंडी ढवळे, ओंकार राऊत, देवयानी देवरुखकर, किशोर राठोड, इंद्रजीत बंदसोडे, विवेक कवाळे, शशांक घाटगे यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. हे प्रदर्शन १५ ते २१ मार्च या कालावधीत सर्वासाठी खुले राहणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes