+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule16 Sep 22 person by visibility 257 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने इचलकरंजी भोनेमाळ येथील नसीरखान पठाण यांच्या अंदर बाहर जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांनी रोख ८० हजार तीस रुपये, ११ मोबाईल संच, पाच मोटार सायकली असा चार लाख सहा हजार ५३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या १७ जणांना अटक केली.
अटक केलेल्या संशयितांची नावे अशी, सद्दाम अस्लम सनदी (वय ३२, कबनूर, इचलकरंजी), विक्रम संजय कुलकर्णी (२६,संतमळा, शाहूनगर), प्रभाकर भीमराव माळगे (३२, कारंडे मळा,शहापूर), अभिजीत दत्तात्रय आंबेकर (४०, नेहरुनगर, इचलकरंजी), विशाल आप्पासो खोत (२६, रा. विक्रमनगर, आरगे मळा), राजू गणपत कांबळे (३१, इंदिरा कॉलनी), मुकेश बाळू जावीर (२६, रा. धनगर माळ, शहापूर), सूरज संजय पाटील (रा. यशवंत कॉलनी), पवन सुनील लाटवडे (२५, यशवंत कॉलनी), राजू लक्ष्मण घस्ते (२८, रा. स्वामी अपार्टमेंट, इचलकरंजी), उमर शहानवाज लोकापुरे (३१, रा. भोने माळ), साहील हमीद मोमीन (२४, भोने माळ), सलीम मुल्ला (रा. इचलकरंजी), तौसिफ मुल्ला (रा. इचलकरंजी), असिफ नसिरखान पठाण (रा. भोने माळ, इचलकरंजी), राजू कांबळे (रा. विक्रमनगर, इचलकरंजी), अनिल लोहार (रा. इचलकरंजी).
पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले, शिवानंद कुंभार, पोलिस उप निरीक्षक महादेव कुऱ्हाडे, पोलिस अंमलदार किरण शिंदे, रणजीत पाटील, हिंदूराव केसरे, संजय इंगवले, महेश खोत, सोमराज पाटील, अमर शिरढोणे, अनिल जाधव यांनी कारवाईत भाग घेतला.