शिरोली एमआयडीसीमध्ये एक जानेवारीपासून हेल्मेट सक्ती
schedule18 Dec 24 person by visibility 70 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये १ जानेवारी २०२५ पासून हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी कळविले आहे. गायकवाड यांचा शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना त्यांनी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट गरजेचे आहे. त्यानुसार कारखाना व्यवस्थापनने यासंबंधी कारखान्यात कार्यरत कर्मचारी-दुचाकीस्वारांना सूचना कराव्यात असे त्यांनी म्हटले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टींने हेल्मेट वापरावे आणि प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे म्हटले आहे. शिरोली एमआयडीसीमध्ये साधारणपणे ५०० कारखाना युनिट आहेत.