+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !! adjustनरेंद्र मोदींची २८ एप्रिलला कोल्हापुरात जाहीर सभा ! राजेश क्षीरसागरांची माहिती adjustस्टोरीमॅप स्पर्धेत विद्यापीठाचे अभिजीत पाटील विजेते ! बांदिवडेतील अग्निस्तंभावर आधारित विषय !! adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा! adjustखासदार धैर्यशील मानेंचा कोडोलीत दौरा : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद adjustकोरे अभियांत्रिकीत युरेका जिज्ञासा २के २४ चे दिमाखात उद्घाटन adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको ? आमदार सतेज पाटलांचा मंडलिकांना सवाल adjustराधानगरीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले शाहू छत्रपतींच्या विजयासाठी -अभिजीत तायशेटे adjustफ्रान्समधील स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या पाच खेळाडूंची निवड
Screenshot_20240226_195247~2
schedule08 May 23 person by visibility 170 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जगभरात ज्या काही वास्तू व भव्य प्रतिकृती आहेत त्या पाहण्यासाठी सर्वांनाच शक्य नसते.या वास्तूंच्या प्रतिकृती पाहण्याची संधी येथील आयर्विन ख्रिश्चन ग्राऊंडवर उपलब्ध झाली आहे.मलिक अँम्युझमेंट यांनी ही संधी कोल्हापूरकरांना उपलब्ध करून दिली आहे.ही मनोरंजन नगरी सुरू झाली असून या नगरीला कोल्हापूरकरांनी भेट द्यावी असे आवाहन जयराज यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
यामध्ये मलेशियन इन टॉवर, दुबई म्युझियम,लंडन ब्रीज, बुर्ज खलिफा,मुन बिल्डिंग, ब्रोकन बिल्डिंग,रिबेन बिल्डिंग,अल रबा बिल्डिंग,ग्लोबल युनिव्हर्सल,फ्रेम बिल्डिंग दुबई आदी पहावयास मिळणार आहे.शिवाय खेळाच्या विविध साधनांमधून धमाल मस्ती करायला मिळणार आहे. आणि विविध ग्रहोपयोगी वस्तू,खाद्यपदार्थ यांचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.सांगली जिह्यातील कपिल मलिक यांच्याद्वारे ही नगरी उभी करण्यात आली आहे.
"सेल्फी आर्ट गॅलरी" शिवाय स्टॉलच्या माध्यमातून खाद्यपदार्थ खाण्याची संधी याठिकाणी उपलब्ध झाली आहे. खेळाच्या माध्यमातून धमाल मस्ती करता येणार आहे.
सेल्फी आर्ट गॅलरी मधून प्रत्यक्ष स्वतःचा फोटो काढता येणार आहे. येथील मनोरंजन नगरीत खेळण्यांमध्ये मोठ्यासाठी जॉईंट व्हील, ब्रेक डान्स, कोलंबस, ड्रॅगन ट्रेन, टोरा टोरा, आकाश पाळणा व लहान मुलांसाठी मोटरसायकल, ड्रॅगन ट्रेन, क्लास वेल पाळणे पाण्यातील कोलंबस,मिकी माउस,नवीन रेंजर व ऑक्टोपस असे विविध प्रकारचे खेळाचे साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. मनोरंजननगरी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. ३१ मे पर्यंत मनोरंजन नगरी कोल्हापूरच्या सेवेत राहणार आहे.तरी या नगरीला कोल्हापूरकरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.