राजमाता जिजाऊ रथयात्रेचे गोकुळतर्फे स्वागत
schedule21 Mar 25 person by visibility 143 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समता, बुंधता प्रस्थापित राहण्यासाठी, सर्व जातीधर्माच्या लोकांना एकतेच्या सूत्रात जोडण्यासाठी राजमाता जिजाऊ रथयात्रा १८ ते १ मे या कालावधीत भोसलेगडी, वेरुळ ते लाल महाल, पुणे असा राज्यस्तरीय समाज जोडो अभियान राज्यस्तरीय जिजाऊ रथयात्रा सुरू झाली आहे. ही रथयात्रा शुक्रवारी कोल्हापुरात दाखल झाली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने या रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ यांनी ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालय येथे स्वागत केले केले. चेअरमन डोंगळे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. यावेळी संचालक अजित नरके, शशिकांतपाटील–चुयेकर, , नंदकुमार ढेंगे, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील,जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम उपस्थित होते.