Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विद्यापीठाची स्थापना, बाळासाहेब देसाईंचा खमकेपणा, सरकारची कमिटी अन् नावावर शिक्कामोर्तब !महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी भाजपमध्ये हालचालीप्रा . उदय आनंदराव पाटील यांना पीएचडी जाहीरयड्रावमधील बुद्धिबळ स्पर्धेत विवान सोनी अजिंक्य,अभय भोसले उपविजेता आनंदी जीवनासाठी वाईटाचा त्याग अन् चांगल्याचा स्वीकार करा : इंद्रजित देशमुखकोल्हापुरात रविवारी होमिओपॅथी परिषदशिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावे, शिवप्रेमींची शुक्रवारी बैठकपीएम विद्यालक्ष्मी योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : शिक्षण सहसंचालक धनराज नाकाडेशेतकऱ्यांची मुंबईत धडक !  आझाद मैदान गरजला एकच जिद्द-शक्तीपीठ रद्द !!महाडिकांची कार्यपद्धती, सामान्य माणसाला पद ! चालक बनला संचालक, शेतकऱ्यांचाही सन्मान!!

जाहिरात

 

उत्तम प्रतीच्या दूध उत्पादन वाढीसाठी गोकुळचे फर्टीमिन प्लस ! एक महिन्याच्या कालावधीसाठी मोफत वितरण !!

schedule01 Feb 25 person by visibility 149 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक (गोकुळ) संघाच्या  महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या माध्यमातून गायी-म्हैशींचे उत्तम दर्जाचे पशुखाद्य तसेच पशुखाद्यपूरक आहाराची निर्मिती केली जाते. अशा महालक्ष्मी कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेट या पशुखाद्याचे पोते संघाकडून खरेदी केल्यास त्यासोबत फर्टीमिन प्लस या मिनरल मिक्श्चरची १ किलो बॅग आपल्या दूध उत्पादकांना एक महिन्याच्या कालावधीसाठी पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. गणेश जयंतीचे औचित्य साधून शनिवारी ( एक फेब्रुवारी २०२५)या योजनेचा शुभारंभ गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते झाला.

ही योजना १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीतच उपलब्ध होणार आहे. या योजनेमुळे प्रतिदिन दूध उत्पादन व उत्तम प्रत वाढीसाठी तसेच जनावरांच्या वंध्यत्व निवारणाच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारची योजना राबविणारा महाराष्ट्रातील गोकुळ हा एकमेव दूध संघ आहे. या योजनेबाबतची विस्तृत माहिती दूध संस्थांना परिपत्रकाद्वारे कळवली असून महालक्ष्मी कोहिनूर डायमंड  महालक्ष्मी गोल्ड पॅलेट या पशुखाद्याचा वापर जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे चेअरमन यांनी केले.  

फर्टीमिन प्लसचा परिणाम दुधाळ जनावरांचे दूध, फॅट आणि एस.एन.एफ. वाढीमध्ये दिसणार आहे. फर्टीमिन प्लस या मिनरल मिक्श्चरचा प्रचार व प्रसार वाढावा आणि गोकुळच्या प्रत्येक दूध उत्पादकाने या फर्टीमिन प्लसचा नियमित वापर करावा असेही त्यांनी आवाहन केले.  याप्रसंगी संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, पशुखाद्य व्यवस्थापक व्ही.डी.पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes