गार्डन्स क्लबच्या पुष्पप्रदर्शनास शोभायात्रेने सुरुवात
schedule06 Dec 24 person by visibility 172 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सेंद्रिय खते वापरू या....मातीचे आरोग्य सुधारु या....माझा देश माझी धरती...माती जपा, जीव जपा अशा घोषणा देत गार्डन्स क्लबतर्फे शुक्रवारी, कोल्हापुरात शोभायात्रा काढण्यात आली. सहा ते आठ डिसेंबर या कालावधीत पुष्पप्रदर्शन खुले आहे.
यानिमित्ताने गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूर व कोल्हापूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या ५४ व्या पुष्प प्रदर्शनास प्रारंभ झाला.यंदाच्या वर्षी आपली माती आपले भवितव्य'* या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत विविध कल्पना राबवत रचना व सजावट महावीर उद्यानात करण्यात आली आहे. दरम्यान शोभायात्रेचे उद्घाटन झेंडा दाखवून उपजिल्हाधिकारी हरीश सूळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी घोषणा देवून बालचमूंनी परीसर दणाणून सोडला.पानाफुलांच्या वेशभूषेत बालचमू या शोभायात्रे सहभागी झाले होते. प्रदर्शनात मांडलेल्या बागकामासाठी उपयुक्त वस्तूंच्या स्टाॅल्सचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर टेराकोटा जर्नीचे गौरव काईंगडे आणि त्यांचे सहकारी यांनी ही कार्यशाळा घेतली.तसेच प्राणी व पक्षी अभ्यासक धनंजय जाधव यांचे 'प्राणी शहराकडे का वळतात '? या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन झाले.
महावीर उद्यानात गार्डन्स क्लबने दरवर्षीप्रमाणे पुष्पप्रदर्शनाबरोबरच अनेक स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये गुलाब आणि विविध प्रकारची फुले, कुंडीतील रोपे, सॅलेड डेकोरेशन, बोन्साय, फुले, पाने व पाकळ्यांची रांगोळी, बुके, बोन्साय, मुक्त रचना, लॅन्डस्केपिंगचा समावेश आहे.
दरम्यान गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी,उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सचिव सुप्रिया भस्मे, खजानिस प्राजक्ता चरणे ,कार्यकारणी सदस्य सुनिता पाटील, शशिकांत कदम, सल्लागार सदस्य रुपेश हिरेमठ, अंजली साळवी, सुभाष अथणे, शांतादेवी पाटील, चित्रा देशपांडे, गौरव काइंगडे, सुमेधा मानवी रघुनंदन चौधरी, कल्पना सावंत, रूपा शहा, रविंद्र साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाले.