दीपावलीचा बोनस म्हणून चार पगार, चालू महिन्याचा अॅडव्हान्स पगार
schedule26 Oct 24 person by visibility 158 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नाविन्यपूर्ण योजना, लोकोपयोगी उपक्रम राबविणारी ग्रामपंचायत म्हणून हातकणंगले तालुक्यातील माणगावची ओळख. वेगवेगळया संकल्पना राबवत ग्रामसमृद्धी साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या या ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी बोनस म्हणून चार पगाराची रक्कम मिळणार आहे. शिवाय चालू महिन्याचा पगार अॅडव्हान्स स्वरुपात दिला जाणार आहे. याशिवाय कामगारांना पाचशे ते एक हजार रुपये पगारवाढ दिली आहे.
याबद्दल सरपंच राजू मगदूम, उपसरपंच विद्या उमेश जोग, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांचे आभार मानले आहेत. हातकणंगले तालुक्यातील माणगाव हे ऐतिहासिकदृष्टया महत्वाचे गाव. ग्रामपंचायतीने नेहमीच नाविन्योपूर्ण उपक्रम राबविले. जिल्हा स्मार्ट ग्रामचा पुरस्कार मिळाला आहे. गावची लोकसंख्या १५ हजाराच्या आसपास आहे. ग्रामपंचायतीचे एकूण १९ कर्मचारी आहेत.
‘ग्रामपंचायतीचे कामगार, गावात उत्कृष्ट सेवा देतात. त्यांच्या कामाची दखल घेत चार पगार बोनस देण्याचा निर्णय घेतला.’असे सरपंच राजू मगदूम यांनी सांगितले.