Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वीर कक्कय विद्यालयात बाल कलाकारांचा बाजार, विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा रुजविणारा उपक्रमउच्च शिक्षण संस्थांमध्ये सशक्त संशोधन संस्कृती रुजवणे काळाची गरज : डॉ. महादेव लोखंडेलिंगायत माळी समाजाच्या सांस्कृतिक केंद्र-वसतिगृह बांधकामासाठी भरीव मदत करणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकरसेवा रुग्णालयातील एमआरआय-सीटी स्कॅन, आयपीएचएल लॅब - यलो फीवर लसीकरण सेंटरचे लोकार्पणडॉ. गणपती कमळकर यांच्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशनछत्रपती शिवाजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे शनिवारी सभासदांना दिपावली भेटवस्तू वाटपसत्यजीत जाधवांनी दिले विद्यार्थिनींच्या हिताला प्राधान्य, केएमटी पास सवलतीस परिवहन समितीकडून मान्यता२९ जूनचे पदोन्नती समुपदेशन रद्द करावे, सेवाज्येष्ठ शिक्षकांचे प्रशासनाला निवेदनमनस्वी महिला समूहातर्फे रविवारी महिला शिक्षकांचा मेळावा, सत्कार सोहळाजयवंत महाविद्यालयाच्या पेटंट डिझाईनवर भारत सरकारची मंजुरीची मोहोर

जाहिरात

 

उच्च शिक्षण संस्थांमध्ये सशक्त संशोधन संस्कृती रुजवणे काळाची गरज : डॉ. महादेव लोखंडे

schedule01 Nov 26 person by visibility 30 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘ उच्च शिक्षण संस्थांनी पाठ्यपुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता नाविन्यपूर्ण संशोधन, नवोपक्रम आणि उद्योगाभिमुख तंत्रज्ञानाला प्राधान्य द्यावे. समाजासमोरील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी सशक्त संशोधन संस्कृती विकसित करणे काळाची गरज आहे.’ असे प्रतिपादन डॉ. महादेव के. लोखंडे यांनी केले.

तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या  रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल आणि इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उच्च शिक्षण संस्थांमधील संशोधन संस्कृती वृद्धिंगत करणे’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. 

डॉ. लोखंडे यांनी आयआयटी मद्रास येथील पदव्युत्तर शिक्षण, मुंबई विद्यापीठातून मिळवलेली डॉक्टरेट आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्समधील ३५ वर्षांहून अधिक अनुभवाच्या आधारे संशोधनाचे महत्त्व विशद केले. ओआरटी, जीएमआरटी आणि लायगो-इंडिया या वैज्ञानिक प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी पेटंट आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोधनिबंधांवर भर देण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील यांनी ग्रामीण व औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या संशोधनाची गरज अधोरेखित केली. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी संशोधनासाठी जिज्ञासा, सातत्यपूर्ण वाचन आणि चौकस विचार आवश्यक असल्याचे सांगितले.यावेळी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, अधिष्ठाता संशोधन आणि नवोपक्रम, डॉ. राहुल काजवे, डॉ. कल्पना पाटील, डॉ .ए. एस. शेरीकर, प्रा. ए. आर. चौगुले, सरिता लोखंडे उपस्थित होते. अदिती घाटगे आणि अदिती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुभाष कोळी यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes