माजी नगरसेवक नियाज खान यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
schedule30 Mar 23 person by visibility 416 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माजी नगरसेवक नियाज खान यांचा वाढदिवस विविध उपक्रम घेत त्यांच्या मित्रपरिवाराने उत्साहात साजरा केला. वाढदिवसानिमित्त सकाळी सावित्रीबाई फुले रुग्णालयात गरजूंना फळे वाटप करण्यात आली. ठाकरे गटाचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम झाले.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना केदार दिघे म्हणाले, “सध्यस्थितीत राजकारण बघता स्थानिक पातळीवर निष्ठावतांपैकी एक नियाज खान आहेत. नगरसेवकाच्या वाढदिवसाला अशी गर्दी बघून येणाऱ्या काळात आपलाच विजय निश्चित होईल यात शंका नाही. ” यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी मनोगते व्यक्त केली. यानंतर महिलांसाठी विशेष मनोरंजनात्मक होम मिनिस्टर २०२३ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये शुभांगी वाघमोडे या प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. द्वितीय क्रमांक रेश्मा पोवार यांना इंडक्शन कुकटॉप तृतीय क्रमांक विद्या घोरपडे यांना मिक्सर ग्राईंडर तर चतुर्थ क्रमांक राजश्री ओतारी यांना डिनर सेट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, प्रकाश गवंडी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.