स्मॅक आयटीआयमध्ये विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण
schedule29 Jan 25 person by visibility 337 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर संंचलित स्मॅक आयटीआयमध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी मुस्कान तांबोळी, सानवी पाटील, वेदिका पाटील, संचिता कांबळे, रिया गुरव या मुलींच्या हस्ते ७६ व्या प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी स्मॅक चे खजानिस बदाम पाटील , स्मॅक क्लस्टर चेअरमन सुरेश चौगुले , आयटीआय ट्रेनिंग कमिटीचे सदस्य जयदीप चौगले, निमंत्रित सदस्य अजिंक्य तळेकर, उद्योजक श्रीकांत साळुंखे, प्राचार्य प्रसन्न वरखेडकर उपस्थित होते. यावेळी मुस्कान तांबोळी, सानवी पाटील, वेदिका पाटील, संचिता कांबळे, रिया गुरव या महिला प्रशिक्षणार्थीनींनी व आयुष शिंदे या फिटर व्यवसाय मधील विद्यार्थ्यानेही मनोगत व्यक्त केले. तसेेच बदाम पाटील, जयदीप चौगले, कुमार साळुंखे, इलेक्ट्रिशियन निदेशिका सौ. स्नेहल धने व निदेशक बाहूबली अक्कोळते यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. फिटर निदेशक शैलेश कासार यांनी सूत्रसंचालन केले.