वीरशैव लिंगायत समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
schedule08 Jun 26 person by visibility 6 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा वीरशैव लिंगायत समाजातर्फे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. समाजाचे अध्यक्ष किरण गवळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी दि इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. मोहन शिंदे यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. शिंदे यांनी, ‘विद्यार्थ्यांनी स्वतमधील क्षमता ओळखावी. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत.’असे नमूद केले. याप्रसंगी, राजेश पाटील चंदूरकर, दिगंबर लोहार यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील गाताडे यांनी प्रास्ताविक केले. अविनाश नासिपुडे, केतन तवटे यांनी सूत्रसंचालन केले. राजू वाली यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सुमित दत्तवाडे, चंद्रकांत हळदे, राहुल नष्टे, सुहास भेंडे, प्रशांत करंबळी, धर्मेंद्र नष्टे, किरण सांगावकर, राजेंद्र करंबळी, अमोल कापसे, भरमाण्णा कापसे, मंदा कुलकर्णी आदी उपस्थित होते.