Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवराज्याभिषेक दिन सोहळयानिमित्त मराठा महासंघातर्फे मिरवणूकनवीन राजवाडयात शिवराज्याभिषेक दिन सोहळा थाटामाटातबिंदू चौकात ‘शिवाजी कोण होता ?’ पुस्तकाचे सामूहिक वाचनजिल्हा परिषदेत शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात, स्वराज्यगुढी उभारून शिवरायांना मुजराअपक्ष उमेदवार संग्राम भालकरांचा सभासद  संपर्कावर भरश्री रवळनाथ को - ऑप हौसिंग फायनान्सच्या कोल्हापूर शाखेचा सोमवारी वर्धापनदिन, शंभर कोटी ठेवीबद्दल आनंद सोहळाअखिल भारतीय महापौर परिषदेच्या कार्यकारिणीवर महापौर रुपाराणी निकम यांची नियुक्तीपालकमंत्री लक्ष देणार का ? सहा महिने पगार थकीत… जिल्हा परिषदेतील जलजीवनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाली कोण !महापालिकेत महायुतीत मानापमान नाट्य, कार्यालय प्रवेश कार्यक्रमापासून शिवसेना नगरसेवक चार हात लांबसभागृह नेता, स्थायी समिती सभापतींचा कार्यालयीन प्रवेश

जाहिरात

 

बिंदू चौकात ‘शिवाजी कोण होता ?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन

schedule07 Jun 26 person by visibility 14 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिन सोहळयाचे औचित्य साधून येथील बिंदू चौक येथे शनिवारी सायंकाळी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.

‘कोल्हापूर ही राजर्षी शाहूंची पुरोगामी,  समतावादी, मानवतावादी भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची गादी म्हणून करवीरच्या गादीला विशेष सन्मानाचे स्थान आहे. त्यामुळे जात, धर्म, वंश, संस्कृती यांचा आधार घेऊन कोणत्याही संस्था, संघटना जर समाजामध्ये द्वेष पेरून माणसांची विभागणी करत असतील तर समाजाची विभागणी करणारा हा सांस्कृतिक दहशतवाद कोल्हापूरकर अजिबात सहन करणार नाहीत. समाजात विभागणी करणारा सांस्कृतिक दहशतवाद कोल्हापूरकर सहन करणार नाहीत.’असा निर्धारही करण्यात आला.

या पुस्तकातील मूळ भावना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सामाजिक सलोखा, विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करणे हा या सामूहिक वाचन उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.  याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, विद्रोही चळवळीतील पार्थ पोळके, आरपीआयचे उत्तम कांबळे, डी जी. भास्कर, नगरसेवक दुर्वास कदम, अनिल म्हमाने, रघुनाथ कांबळे, प्रशांत आंबी, बाळासाहेब भोसले, पांडुरंग कांबळे, सोमनाथ घोडेराव, सुभाष रामुगडे, डॉ. अनिल माने, जयसिंग जाधव, जी. बी. अंबपकर, डॉ. कपिल राजहंस, अ‍ॅड. करुणा विमल, अंतिमा कोल्हापूरकर, विशाल देवकुळे, रघुनाथ मांढरे, लालासाहेब नाईक, निलेश बनसोडे, सुनील जाधव, सीमा पाटील, बाळासाहेब वाशीकर, सुखदेव बुध्याळकर रमेश कांबळे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes