अभियंता तरुण पिढीने उद्योजकीय मानसिकता बाळगावी - दीपक जोशी
schedule10 Dec 25 person by visibility 29 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सकारात्मक मनस्थिती, उपलब्ध संधीचा केलेला योग्य वापर व या सर्वांच्या सोबतच आत्मनिर्भर व विकसित भारताचे स्वप्न हेच आपल्या भविष्यातील यशाचा पाया रचेल.अभियंता तरुण पिढीने उद्योजकीय मानसिकता बाळगून,त्याला पूरक असणाऱ्या इकोसिस्टीमचा सकारात्मक वापर करून या देशातील लाखो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे आवाहन प्रेसिडेंट ह्यूमन रिसोर्स टाटा ऑटो-कॉम्प लिमिटेडचे व्हाईस प्रेसिडेंट दीपक जोशी यांनी केले.
केआयटी अभियांत्रिकी ( प्रदत्त स्वायत्त ) महाविद्यालयामध्ये नुकतीच स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन -२५ ही स्पर्धा झाली. भारत सरकारच्या शिक्षण विभागाच्या इनोव्हेशन सेल्सच्या वतीने व एआयसीटीई यांच्या सहकार्याने अंतिम फेरीच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ मंगळवारी झाला. दरम्यान स्पर्धेचे मुख्य आयोजक, संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी उपस्थितांसमोर मांडला. ८-९ डिसेंबर २५ रोजी झालेल्या स्मार्ट इंडिया स्पर्धेच्या स्पर्धकाच्या कोल्हापुरात पाऊल ठेवल्यापासून ते अंतिम सत्रापर्यंत झालेल्या सर्व टप्प्यांची माहिती त्यांनी सर्वाना करून दिली. या स्पर्धेच्या एआयसीटीईच्या माध्यमातून नियुक्त केलेल्या नोडल प्रमुख श्रीमती आकांक्षा शेजाळ यांनी या स्पर्धेची राष्ट्रीय स्तरावरील आवश्यकता नमूद केली.
स्पर्धेच्या मूल्यांकनासाठी उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातून सहभागी झालेल्या सर्व परीक्षकांचे व्यक्तींचे अभिनंदन स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले.सहभागी झालेल्या २८ संघांना सहभाग प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.याच वेळी ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-२५’ स्पर्धेच्या उत्तम नियोजनाबद्दल केआयटीचे मुख्य आयोजक, संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, स्पर्धा संयोजक प्रा.अजय कापसे, सहसंयोजक प्रा.प्रवीण गोसावी यांचा विशेष सन्मान यावेळी मुख्य अतिथी जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
बक्षीस वितरणाला प्रमुख पाहुण्यांसह ,केआयटीचे चेअरमन साजिद हुदली, संचालक वनरोट्टी, एआयसीटीई नियुक्त केंद्रप्रमुख शेजाळ यांच्या हस्ते प्रत्येक संघास स्मृतीचिन्ह, एक लाख पन्नास हजार रुपयांचे बक्षीस, प्रमाणपत्र दिले. स्पर्धेच्या नियोजनात संस्थेचे उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले यांचे मार्गदर्शन मिळाले. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रुति काशीद व प्रा शुभदा सावखंडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने झाली.